Tera Naam sunke new Song Saam tv
मनोरंजन बातम्या

Aparshakti Khurana New Song: 'तेरा नाम सुनके...'; अपारशक्ती खुराणाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Tera Naam sunke new song Released: अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेत्यासहित संगीतकार गायक देखील आहे. संगीत कौशल्य दाखवून त्याने अभिनयासोबत संगीतकार म्हणूनही ओळख निर्माण केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Aparshakti Khurana Released New Song:

अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेत्यासहित संगीतकार गायक देखील आहे. संगीत कौशल्य दाखवून त्याने अभिनयासोबत संगीतकार म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. याच अष्टपैलू कलाकाराचं 'तेरा नाम सुनके' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Latest Marathi News)

अपारशक्ती खुराणाचं 'कुडिये नी' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्याचं गाणं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्याचबरोबर ते गाणं सुपरहिट ठरलं होतं. त्या गाण्याला 25 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ते गाणं आजही ट्रेंडमध्ये आहे.

आता अपारशक्तीचं 'कुडिये नी'नंतर 'तेरा नाम सुनके' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अपारशक्तीच्या या गाण्यात एक हृदयस्पर्शी संगीतमय कथा आणि भावपूर्ण गीत यांचं अनोखं मिश्रण आहे.

'तेरा नाम सुनके' हे गाणं निर्मान यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलं आहे. तर हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'तेरा नाम सुनके' या नवीन गाण्याबद्दल अपारशक्तीने भरभरून कौतुक केलं आहे. 'मला वाटतं की, मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या गाण्यानंतरही नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे, असं त्याने सांगितलं.

'ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळणे , होस्टिंग , गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल 'कुडिये नी'ला इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाईवर खूप प्रेम मिळत आहे. आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मी लिहिलेलं संगीतबद्ध केलेली ही गाणी प्रेक्षकांना आवडतील, यात शंका नाही, असंही अपारशक्तीने विश्वासाने सांगितलं.

'तेरा नाम सुनके' चाहत्यांना आणि संगीत रसिकांना अपारशक्ती खुराणाच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविले आहेत.

बर्लिन व्यतिरिक्त अपारशक्ती पुढे बहुप्रतीक्षित "स्त्री 2" मध्ये दिसणार आहे. तो अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित 'फाइंडिंग राम' या आकर्षक माहितीपटातही झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT