Ranbir Kapoor SAAM T V
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : 'रॉकस्टार' रणबीरला का थोबाडीत खावी लागली? तेही तब्बल तीन वेळा, नेमकं कारण काय?

Shreya Maskar

बॉलिवूडचा 'रॉकस्टार' म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीर प्रत्येक चित्रपटात उत्तम अभिनय करतो. त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

रणबीरचा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. यात रणबीरची भूमिका थोडी वेगळी आणि विशेष होती. या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय यांनी एकत्र काम केलं आहे. चाहते तर या चित्रपटाच्या गाण्यांच्या प्रेमात आजही आहेत. या चित्रपटात रणबीर-अनुष्काची (Anushka Sharma) मैत्री आणि त्या पलिकडचे प्रेम दाखवले आहे. या चित्रपटात रणबीरच्या भूमिकेच नाव अयान तर अनुष्काच्या भूमिकेच नाव अलीजेह होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील आपली जादू दाखवली होती.

'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट भावनिक जरी असला तरी त्याचे शूटिंग करताना अनेक कॉमेडी किस्से झाले आहेत. या चित्रपटात एका सीनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने रणबीरच्या थोबाडीत मारलेली पाहायला मिळते. या पाहायला जरी चांगला वाटला असाला तरी या सीनमुळे रणबीर खूप संतापला होता.

अयान त्याची मैत्रीण लिसा हेडन आणि अलिझेहचा प्रियकर इम्रान अब्बासला टॉयलेटमध्ये एकत्र पाहतो . त्यावेळी अलिझेह अयानला भानावर आणण्यासाठी त्यांच्या थोबाडीत मारते. असा हा चित्रपटातील सीन आहे. हा सीन नीट शूट होण्यासाठी अनुष्काने तब्बल तीन वेळा रणबीरच्या थोबाडीत मारते. ज्यामुळे तो प्रचंड संतापतो. एका व्हिडिओ रणबीर-अनुष्काचं भांडण व्हायरल झालं होत. यात अनुष्काने रणबीर थोबाडीत मारल्यावर रणबीर आणि अनुष्कात भांडण होत. रणबीर अनुष्काला म्हणतो की, "हा विनोद नाही आहे", त्यावर अनुष्काला रागात बोलते की, "मी हे जाणूनबुजून करत आहे का?"यावर रणबीर अनुष्काला जोरात मारू नका असे बोलतो आणि अनुष्का देखील त्याची माफी मागते. अनुष्काला आणि रणबीर आता दोघही आपल्या करिअरमध्ये प्रगती करत आहेत. तसेच दोघांचीही छान क्युट फॅमिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT