Anushka Sharma with her daughter Vamika Instagram @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma: अनुष्काला झाली कोलकाताच्या समोसे, रसगुल्ल्याची आठवण; जुने फोटो शेअर करत म्हणाली...

अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिची मुलगी वामिकालासुद्धा दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anushka Sharma News: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपट चकडा एक्सप्रेसचे शूटिंग कोलकाता येथे करत आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर कोलकता येथील काही जुने फोटो शेअर केले आहेत. अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिची मुलगी वामिकालासुद्धा दिसत आहे. वामिकाचा चेहरा तिने कॅमेरापासून लपवला आहे.

फोटोंमध्ये अनुष्काने कोलकात्यातील काही आवडते पदार्थ देखील शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ईट-प्रे-लव : माय कोलकाता फोटो डंप! #ScheduleWrap #ChakdaXpress #कोलकाता बेलूर मठ, कालीघाट मंदिर, आलिया फिरनी, बलवंत सिंग की चाय आणि समोसे, मिठाई आणि रसगुल्ले, पॅरामाउंट के शरबत, गिरीश्च दे मलाई रोल, पुतीराम की कचोरी आलू.” (Photo)

एका मुलाखतीत अनुष्का म्हणाली की, तिच्या हृदयात कोलकाताची एक खास जागा आहे. “मी येथे परी चित्रपटाच्या वेळी शेवटचे शूट केला होता आणि त्या प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यानच्या माझ्या अनेक गोड आठवणी आहेत. मी ईडन गार्डन्स येथे चकडा एक्सप्रेसच्या घोषणेचा व्हिडिओ देखील शूट केला होता आणि झुलन सुद्धा त्यावेळी इथे होती. तिचं सेटवर असणं आणि तिच्याशी संवाद साधणं खूप छान होतं. ती एक सकारात्मक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे, इथे परत येणे म्हणजे माझ्यासाठी आणि टीमसाठी आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण करण्यासारखं आहे.” (Movie)

चकडा एक्सप्रेस हा आगामी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा प्रवासावर आधारित आहे. कोलकात्यात चित्रीकरण करण्यापूर्वी अनुष्का या चित्रपटाच्या प्रशिक्षणासाठी यूकेमध्ये गेली होती. (Netflix)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT