Anushka Sharma Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Post: 'माझं भाग्य आहे की... ' अनुष्का शर्माने पती विराटचं तोंडभरून केलं कौतुक

Anushka Sharma Post For Virat Kohli: अनुष्काने विराटसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anushka Sharma Praises Virat Kohli:

बुधवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप सेमी फायनलाचा सामना रंगला. भारताने सामना जिंकून फायनलमध्ये आपलं स्थान अढळ केलं आहे. कालच्या सामन्यात सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. त्यातील एक खेळाडू म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर ५० वे शतक झळकावत विक्रम केला.

विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांचा विक्रम मोडत ५० वं शतक पूर्ण केलं. यावेळी मॅच पाहण्यासाठी विराटची बायको अनुष्का शर्मा उपस्थित होती. अनुष्कानेदेखील विराटच्या सेंच्युरीचा आनंद घेतला. अनुष्काने हा आनंद सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अनुष्का शर्माने केलं विराट कोहलीचं कौतुक

विराट कोहलीने काल विश्वविक्रम केला. त्यावेळी सेंच्युरी पूर्ण केल्यावर विराटने अनुष्काला प्लाइंग किस देत आपला आनंद साजरा केला. त्यानंतर आता अनुष्काने सोशल मीडियावर विराटसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

विराटचा विश्वविक्रमाचा फोटो शेअर करत, 'देव हा उत्कृष्ट लेखक (Scriptwriter) आहे. मला तुझे प्रेम मिळाले. तुला खेळताना, दिवसेंदिवस प्रगती करताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना बघता आलं यासाठी मी भाग्यवान आहे. तू स्वतः शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिला. तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस'. असं म्हणत विराटचं कौतुक केलं आहे.

याचसोबत अनुष्काने सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. मोहम्मद शमीचा फोटो शेअक करत त्यावर टाळ्यांचे इमोजी शेअर केले आहेत.

दरम्यान, भारत न्यूझीलंडच्या सामना खूपच रंजक झाला. हा सामना पाहण्यासाठी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. रणवीर कपूर, शहीद कपूर, विकी कौशल, माधुरी दिक्षित, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी वानखेडे मैदानात उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

SCROLL FOR NEXT