Saam TV
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma-Arijit Singh: अनुष्कासाठी अरिजित बनला फोटोग्राफर! भारत-पाकिस्तान सामन्यातील मैदानातील VIDEO व्हायरल

Pooja Dange

१४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पार पडला. भारताने ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. भारताला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी या सामन्याला हजेरी लावली होती. भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्याआधी शंकर महादेवन, अरिजित सिंग, सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग या गायकांच्या सुरांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

भारतीय गायकांच्या या कॉन्सर्टचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा कॉन्सर्ट कुठेही टेलिकास्ट झाला नाही किंवा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला नाही.

भारत-पाकिस्तान सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर एका व्हिडीओमध्ये अरिजित सिंग आणि अनुष्का शर्मा फोटोग्राफर झाल्याचे दिसत आहे.

अरिजित सिंग आणि अनुष्का शर्माचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंग, अनुष्काला तुझा एक फोटो काढू का? असे विचारात आहे. अनुष्काने अरिजित सिंगला फोटो काढण्यासाठी होकार दिल्यानंतर व्हिक्टरीची दाखवत अनुष्काने पोज दिली. यावेळी अरिजित सिंग आणि अनुष्काच्या आजुबाजुला असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

भारत-पाकिस्तान सामन्याआधी अनुष्काचा एक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हारला झाला होता. अनुष्का कडक सिक्युरिटीत एअरपोर्ट बाहेर आली आणि गाडीत बसली. यावेळी अनुष्का खूप हळू चालत होती. यामुळे ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांनी अजून जोर धरला.

क्रिटेटपटू दिनेश कार्तिकने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दिनेश कार्तिकसह सचिन तेंडुलकर आणि अनुष्का शर्मा देखील होती. हा फोटो ३५००० फुटांवर काढला असल्याचे दिनेश कार्तिकने त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा फोटो देखील काल खुप व्हायरल होत होता.

तर अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतरचा आहे. या व्हिडीओमध्ये विराट अनुष्काचा हात पकडून तिला घेऊन जाताना दिसत आहे. नेटकऱ्यांना या व्हिडीओमध्ये अनुष्काचे बेबी बंप देखील दिसत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT