Anushka Sharma | Virat Kohli Saam TV
मनोरंजन बातम्या

Virat Anushka Good News : मुलगी वामिकानंतर विराट-अनुष्काच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली आता मुंबईजवळील अलिबाग परिसरात आलिशान आठ एकरच्या जमिनीचे मालक बनले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli) आता मुंबईजवळील अलिबाग परिसरात आलिशान आठ एकरच्या जमिनीचे मालक बनले आहेत. ही जमीन अलिबागमधील जिराड या गावाजवळ ८ एकर जागेवर पसरलेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कपलने मालमत्ता घेण्यासाठी सुमारे १९.२४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार या कपलने या जमिनीसाठी सरकारला १.१५ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा व्यवहार पूर्ण केला. विराट कोहली सध्या दुबईत असून आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. या व्यवहाराची देखरेख 'समीरा हॅबिटॅट्स' या प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीने केली होती. शाहरुख खानची देखील अलिबागमध्ये एक मोठी मालमत्ता आहे, जिथे तो अनेकदा आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटायला जात असतो.

अनुष्का आणि विराटने सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. परंतू, विराटच्या बिजी शेड्यूलमुळे त्याला प्रत्यक्षात अलिबागमध्ये येऊन व्यवहार करता आला नाही. अलिबागमध्ये उद्योगपती तसेच चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटपटू जमीन खरेदी करत आहेत. आता या यादीत विराट आणि अनुष्काचाही समावेश झाला आहे.

माजी क्रिकेटपटू, राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सुमारे दशकभरापूर्वी अलिबागमध्ये घर बांधले होते. यासोबतच अलिबागमध्ये क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सची मोठी मालमत्ता आहे. शाहरुख खानपासून विराट कोहलीपर्यंत, अलिबाग हे सर्व सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT