Anshula Kapoor  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

जान्हवी कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा रोहन ठक्करसोबत साखरपुडा झाला आहे. न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये रोहनने तिला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं.

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध निर्माचे बोनी कपूर आणि पहिली पत्नी मोना शौरी यांची लेक अंशुला कपूरने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. अंशुलाने तिचा साखरपुडा झाला असल्याची माहिती दिली आहे. अंशुलाने बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर अंशुलाने फोटो देखील शेअर केले आहेत.

अंशुला कपूरने तिच्या सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. अंशुलाने रोहनसोबतची तिची भेट कशी झाली याविषयी देखील संपूर्ण सांगितलं आहे. अंशुलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आमची पहिल्यांदा ओळख एका सोशल मीडियावर माध्यमाद्वारे झाली आहे. त्या दिवशी मंगळवार होता मला चांगले माहित आहे. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं त्यावेळी साधारण १:१५ वाजले होते. त्यानंतर आम्ही सकाळ होईपर्यंत बोलतच राहिलो. अखेर ३ वर्षांनंतर त्याने माझ्या आवडत्या शहरातील सेंट्रल पार्कमध्ये कॅसलसमोर मला प्रपोज केलं आहे.

पुढे तिने म्हटलं आहे की, एवढंच नाही तर भारतातील वेळेनुसार रोहनने मला १.१५ वाजताच प्रपोज केलं यावेळी मला असं वाटलं की सगळं जग थांबलंय.. तो क्षण अगदी जादुई वाटावा असचं... एक शांत प्रेम जे घरासारखा अनुभव देतं...'

तिने म्हटलं की मी कधीच परीकथांवर विश्वास ठेवला नाही मात्र रोहन ठक्करने मला त्या दिवशी जे गीफ्ट दिले ते बेस्ट होतं त्याने ते जाणीवपूर्वक विचार करून केलं होतं. मी देखील त्याला हो म्हणाले.. माझे अश्रू, हास्य आणि असा आनंद जे मी शब्दांत मांडू शकत नाही कारण २०२२ पासून ते तुझं आणि माझं सर्वस्व आहे. मी माझ्या सर्वात बेस्ट फ्रेंडशी साखरपुडा केलाय आणि आता पुढे मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे"

या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की अंशुला आणि रोहन न्यूयॉर्कमध्ये आहेत रोहनने अंशुलाला न्यू यॉर्कच्या आयकॉनिक सेंट्रल पार्कमध्ये फिल्मी स्टाईल गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर अंशुलाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी मंडळीनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

अंशुला कपूरचा होणार पती रोहन ठक्कर हा एक पटकथा लेखक आहे. त्याने कॅलिफोर्निया युनिव्हर्हसिटीमधून शिक्षण पूर्ण केलं सध्या तो मुंबईत राहत आहे. माहितीनुसार रोहन सध्या करण जहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये फ्रिलान्सर लेखक म्हणून काम पाहतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT