Kareena Kapoor Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor khan : सैफच्या आधी करीना कपूरच्या हृदयात कोण? 'हा' नेता आहे करीनाचा क्रश

करीना कपूरच्या क्रश लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या व्यक्तीच्या नावाचा समावेश झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूर खान(kareena Kapoor Khan) तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीचे नाव एकापेक्षा जास्त हँडसम हंकशी जोडले गेले आहे. परंतु करीना कपूर खानने अभिनेता सैफ अली खानशी(Saif Ali Khan) लग्न केले आहे. तथापि, लग्नापूर्वीच्या मधल्याकाळात करीनाच्या क्रश लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या व्यक्तीच्या नावाचा समावेश झाला होता. करीना कपूरला जी व्यक्ती पसंत होती आणि करीना ज्या व्यक्तीला डेट करू इच्छित होती. ते दुसरे कोणी नसून काँग्रेसचे नेते राहुल गांधी होते.

करीना कपूर खानने स्वतः एका टॉक शोमध्ये याचा खुलासा केला आणि सांगितले की तिला राहुल गांधींना डेट करायचे आहे. करीना कपूर खानने राहुल गांधींना डेट करण्याच्या तिच्या इच्छेमागील अतिशय स्मार्ट कारणही या टॉक शोमध्ये सांगितले.

करीना कपूरने रेंडेजवस विथ सिमी ग्रेवालच्या एका एपिसोडमध्ये राहुल गांधींवर क्रश असल्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या शोच्या एका व्हिडिओमध्ये सिमी ग्रेवाल करीना कपूरला विचारते की तिला कोणाला डेट करायचे आहे, उत्तर देत करीना म्हणते, 'मला हे सांगायचे की नाही हे माहित नाही,परंतु मला काही फरक पडत नाही. वादग्रस्त असला तरी हरकत नाही... पण मला राहुल गांधींना जाणून घ्यायचे आहे.'

करीना पुढे म्हणली, ' मी एकदा एका मॅगझिनमध्ये राहुल गांधींचे फोटो पहिले आणि मला असं वाटलं त्यांच्याशी बोलायला काय हरकत आहे? मी सिनेसृष्टीतील कुटुंबातून आले आहे आणि ते एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आहे. त्यामुळे आमच्यातील संवाद रंजक असेल असे मला वाटते. आता करीना कपूर ही लग्नानंतर २ मुलांची आई बनली आहे. तर राहुल गांधी सध्या राजकारणातील एक मोठं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT