Fakira Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Fakira Movie: इतिहासाच्या पानात दडलेलं शौर्य ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर, चित्रपटाची स्टारकास्ट आली समोर

Fakira Marathi Movie Poster: वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून वास्तवदर्शी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘फकिरा’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Bhaurao Karhade Movie Poster Released

मराठमोळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची मराठी सिनेसृष्टीमध्ये खास दर्जाच्या चित्रपटामुळे त्यांची ओळख कायम आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ आणि ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून वास्तव दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे यांचा लवकरच नवीन चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘फकिरा’ असं असून त्यांनी नुकतंच या चित्रपटाची घोषणा केली. (Marathi Film)

दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी चाहत्यांना वेगवेगळ्या धाटणीचे दिलेले आहेत. त्यांच्या चित्रपटांची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘फकिरा’ चित्रपट येत्या आगामी वर्षी रिलीज होणार आहे. (Marathi Actors)

मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. (Marathi Actress)

समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वांविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे चित्ररूप रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मित ‘फकिरा’ चित्रपटात प्रमुख भूमिका कोण साकारणार? अद्याप हे तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंग वेळी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंतसह आदि मान्यवर उपस्थित होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT