Ankita Lokhande  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता; FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

Ankita Lokhande Post : अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत. नेमकं प्रकरण काय,जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत.

मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे.

अंकिता लोखंडेने यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने हिंदी मालिका, चित्रपट आणि अनेक रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. आता मात्र अंकिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत. याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. यासंबंधित एक पोस्ट अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर केली आहे.

अंकिता लोखंडेची पोस्ट

"तातडीची सूचना: बेपत्ता असल्याची सूचना

आमच्या घरातील कामावर असलेली कांता यांची मुलगी आणि तिच्या मुलीची मैत्रीण "सलोनी आणि नेहा" 31 जुलै, सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांना शेवटचे वाकोला परिसरात पाहिले गेले. मालवणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांचा ठावठिकाणा अद्याप सापडत नाही. ते केवळ आमच्या घराचा भाग नाहीत तर ते आमच्या कुटुंबच आहेत.

आम्हाला खूप काळजी वाटत आहे. विशेषत @mumbaipolice आणि #मुंबईकरांना विनंती आहे की ही माहिती पसरवा आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी शक्य ती मदत करावी. जर कोणी काही पाहिले असेल किंवा ऐकले असेल तर कृपया ताबडतोब संपर्क साधा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा.

तुमचा पाठिंबा आणि प्रार्थना ही सध्या सर्वकाही आहे.

विकी आणि अंकिता "

अंकिताने ही पोस्ट शेअर करून नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. अंकिताने पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना टॅग केले आहे. अंकिताच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT