Marathi Serial Off Air : "...One Last Time"; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीनं केली खास पोस्ट

Marathi Serial Update : 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्रीने सेटवरील शूटिंगचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
Marathi Serial Update
Marathi Serial Off AirSAAM TV
Published On
Summary

'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने सेटवरील शूटिंगचे शेवटचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

'शिवा' मालिका लवकरच संपणार आहे.

नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. तशाच जुन्या मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मराठी टेलिव्हिजनवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आहे. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने याची खास पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत केली आहे. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही मालिका दुसरी-तिसरी कोणी नसून 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' (Shiva) मालिका आहे.

आता लवकरच 'शिवा' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्याला तिने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "सगळं काही बदलण्यापूर्वी One Last Time…" 'शिवा' मालिका संपणार असल्याची चर्चा खूप काळापासून सोशल मीडियावर सुरू होती. त्यामुळे चाहते खूपच नाराज झाले आहेत.

'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर पाहायला मिळाले. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'शिवा' मालिकेचा शेवटचा भाग 8 ऑगस्टला प्रसारित केला जाणार आहे. पूर्वा कौशिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची शेवटचा 'शिवा' लूक पाहायला मिळत आहे. तसेच मालिकेचे शेवटच्या दिवसाचे शूटिंग होताना पाहायला मिळत आहे.

Purva kaushik
Purva kaushikinstagram

नवीन मालिका

ऑगस्ट महिन्यात दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 11 ऑगस्टपासून 'वीण दोघांतली ही तुटेना' आणि 'तारिणी' या दोन मालिका नव्या सुरू होणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'तारिणी' मालिकेत शिवानी सोनार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.'वीण दोघांतली ही तुटेना' संध्याकाळी 7.30 वाजता पाहता येणार तर 'तारिणी' रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे.

Marathi Serial Update
Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 collection : अजय देवगन अन् सिद्धांत चतुर्वेदीमध्ये कांटे की टक्कर, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?
Q

'झी मराठी' वरील कोणती मालिका संपणार आहे?

A

शिवा

Q

'शिवा' मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होणार?

A

8 ऑगस्ट

Q

'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत कोण?

A

पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com