Ankita Lokhande SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande : बाप्पाची मूर्ती घ्यायला गेलेल्या अंकिता लोखंडेला भरबाजारात मावशीची का मागावी लागली माफी?

Ankita Lokhande Ganpati Video : बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे गणपतीची मूर्ती घेताना स्पॉट झाली. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अंकिता एका महिलेची माफी मागत आहे.

Shreya Maskar

अभिनेत्री अंकिता (Ankita Lokhande) लोखंडेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अंकिताच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने अनेकांची मने जिंकली. बिग बॅास १७ च्या सीजन मध्ये देखील अंकिताने आपली जादू दाखवली होती. अंकिताचा गणेशोत्सव हा आवडता सण आहे. म्हणून ती दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करते. यंदाही अंकिताने वाजतगाजत गणपती बाप्पाला घरी आणले.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेश चतुर्थी सर्वत्र थाटामाटात साजरी करताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली. सगळेच ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाच स्वागत करत आहे. संपूर्ण जग गणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील घरी गणपती बाप्पा विराजमान केला आहे. सध्या अंकिताचा एक गणपती मूर्ती खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंकिताच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये ती माफी मागताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अनेक लोकांची गर्दी जमलेली होती. सर्वानांच गणेशाला लवकर घरी आणायचे होते. याच गर्दीत अंकिता ही शुक्रवारी बाप्पाची मूर्ती आण्यासाठी गेली होती. तिला पाहून अनेक चाहत्यांची गर्दी जमली. फॅनस लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी पाहून पॅपराइज ही आले. एवढी गर्दी पाहून एका महिलेला अंकिताचा खूप राग आला होता. यामुळे महिला जोर जोरात ओरडत होती. चिडचिड करत होती. हे मुद्दा जास्त वाढू नये यामुळे अंकिताने त्या महिलेची माफी मागितली आणि तिथून त्वरित निघून गेली.

या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. त्यात काही नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट्स देखील केल्या आहेत. ते अंकिताची थट्टा उडवत आहेत. अंकिता कोणाची तरी माफी मागू शकते या गोष्टीवर अनेकांच्या विश्वास बसत नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT