Ankita- Vicky Meet Mothers In Weekend Ka Vaar Of Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky- Ankita Mothers In Bigg Boss 17: ‘घरामध्ये कधी भांडले नाही, मग इकडे का भांडताय?’ असा सवाल उपस्थित करत आईने केली विकीची कानउघडणी

Chetan Bodke

Ankita- Vicky Meet Mothers In Weekend Ka Vaar Of Bigg Boss 17

वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणाऱ्या बिग बॉसचा सध्या १७ वा सीझन सुरु आहे. नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरणाऱ्या या शोची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शोमध्ये अंकिता आणि तिचा पती विकीमध्ये जोरदार भांडण आणि तु तु मैं मैं होताना दिसत आहे. येत्या एपिसोडमध्ये बिग बॉसकडून अंकिता आणि विकीला एक सरप्राईज मिळणार आहे. येत्या एपिसोडमध्ये अंकिता आणि विकीची आई दोघांनाही भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात पोहोचल्या आहेत. (Bigg Boss)

सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा प्रोमो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर) वर ‘BiggBoss24x7’ या अकाऊंटने प्रोमो शेअर केला आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, व्हिडिओमध्ये आईला पाहून अंकिता भावूक होते. ‘आई मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते, आई मला तुझी आठवण येते.’ असं ती आपल्या आईला म्हणते. तिच्यासोबत विकीही दिसत आहे. (Bollywood)

आईला पाहून त्याचे ही डोळे पाणावले.‘तुमच्यामध्ये घरी कधीही भांडणं झाले नाही. मग तुम्ही इथे घरामध्ये आल्यानंतर का इतके भांडत आहेत. जेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांना भेटतात त्यावेळी प्रेमाने भेटा. एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त करा.’ असं विकीची आई दोघांनाही म्हणाली. (Bollywood News)

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये चांगलेच भांडणं झाले होते. ‘मी तुझ्यासोबत लग्न केलं, राहिले म्हणून माझं नशीब खराब झालं. तू आता विसरुन जा आपलं लग्न झालं होतं. आजपासून आपण दोघेही वेगवेगळे झालोय. तू फक्त माझा वापर केला आहेस.’ असं म्हणत त्याचा प्रचंड राग राग केला होता. ‘विकेंड का वार’ मध्ये सलमानने विकी- अंकिताला त्यांच्यातले नाते सुधारण्याचा सल्लाही दिला होता. दोघांचाही बिग बॉसच्या घरामध्ये बऱ्याचदा वाद विकोपाला गेला आहे. अनेकदा त्यांच्यामध्ये वादाचे खटके उडाले आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT