Animal Trailer Released Instagram/ @animalthefilm
मनोरंजन बातम्या

Animal Trailer Released: ‘ॲनिमल’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज, रणबीरच्या अभिनयाने चित्रपटाला लावले चारचाँद

Animal Film Trailer Out: ‘ॲनिमल’च्या ट्रेलरमधून प्रेक्षकांना वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट वेगळ्या पद्धतीने ‘ॲनिमल’मधून मांडण्यात आली आहे.

Chetan Bodke

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Animal Film

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रश्मिका आणि रणबीरच्या ‘ॲनिमल’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. येत्या १ डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटातील पात्रांची, टीझरची आणि गाण्यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट वेगळ्या पद्धतीने ‘ॲनिमल’मधून मांडण्यात आली आहे. चित्रपटामध्ये, अनिल कपूरने रणबीरच्या वडीलांचे पात्र साकारले आहे. अनिल कपूरने चित्रपटामध्ये एका उद्योगपतीचे पात्र साकारले आहे. आणि रणबीरने एका गँगस्टरचे पात्र साकारले आहे. आपल्या वडीलांवर अज्ञातांनी गोळ्या चालवलेल्या असतात. त्याचा बदला ॲनिमल घेताना दिसत आहे. तो बदला कशापद्धतीने घेतो हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. (Bollywood)

बॉबी देओल नेमका कोणते पात्र साकातो, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. चित्रपटामध्ये चौघांच्याही अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरच्या शेवटी रणबीर आणि बॉबी यांच्यातला फायटिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यासोबतच रश्मिका- रणबीरमधील वाद सुद्धा ट्रेलरमध्ये दिसतोय. ट्रेलर काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ट्रेलरला क्षणार्धातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी रणबीरचा अभिनय पाहून संजू सारखाच अभिनय केल्याचे बोलत आहे. (Bollywood Film)

चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करीत असून चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल दिसणार आहेत. चित्रपटामध्ये रणबीर कपूरने ‘ॲनिमल’चे पात्र साकारले आहे.अनिल कपूरने उद्योगपती बलबीर सिंग नावाचे पात्र साकारले आहे.

तर रश्मिका मंदान्नाने चित्रपटामध्ये ‘ॲनिमल’च्या पत्नीचे पात्र साकारत आहे. तिचे गीतांजली असे नाव आहे. तर बॉबी देओलने मुक खलनायकाचे पात्र साकारले आहे. हे चौघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT