Anil Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Celebrates 40 In Bollywood : मला तुमचे सहकार्य हवे आहे ... इंडस्ट्रीत ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनिल कपूरचे भावुक आवाहन

Anil Kapoor Share Emotional Post : अनिल कपूर यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Anil Kapoor Share Video From His 1st Movie : बॉलिवूडमधील चित्रपटारुन अभिनेता म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूर यांना अभिनय क्षेत्रात ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. अनिल कपूरकडे पाहून त्यांना या इंदूस्ट्रीत ४० वर्ष झाली असतील यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. त्यांचा लूक, फिटनेस एखाद्या तरुण अभिनेत्यासारखा आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे, त्यांच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकारांचे, पालकांचे, मोठ्या भावाचे आभार मानले आहेत.

अनिल कपूर यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांचा पहिला चित्रपट 'वो ७ दिन'मधील आहे. हा व्हिडिओ शेअर करत अनिल कपूर यांनी एक लांबलचक नोट देखील लिहिली आहे. या नोटमध्ये अनिल कपूर त्यांनी त्यांच्या ४ दशकांच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

'आज मी एक अभिनेता आणि एंटरटेनर म्हणून 40 वर्षे पूर्ण केली… प्रेक्षकांनो, तुम्ही मला स्वीकारल्याची, प्रेम केल्याची आणि आशीर्वाद मिळाल्याची 40 वर्षे!

म्हणतात ना जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडते असे काहीतरी करत असता, तेव्हा वेळ निघून जातो... आश्चर्य वाटण्यासारखं म्हणजे ही ४० दशकं डोळ्यांची पापणी लवता न लावताच गेल्यासारखी वाटतात! मी इथेच आहे आणि मला हेच करायचे आहे आणि हेच आहे...

आयुष्यात या टप्प्यावर येण्यासाठी अनेकांनी मला मदत केली आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पहिली संधी दिल्याबद्दल मी विशेषत: स्वर्गीय बापू साब, माझा भाऊ बोनी कपूर आणि माझे वडील सुरिंदर कपूर यांचे आभार मानू इच्छितो. (Latest Entertainment News)

वोह सात दिन मध्ये... मी नासिरुद्दीन शाह आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचाही सदैव ऋणी आहे त्यांनी एका नवोदिताचे स्वागत केल्याबद्दल. त्यांच्या स्टारडममध्ये ही मला चमक दाखवता आली. या दिग्गजांचा आणि त्या प्रत्येकाचा ज्याने मला स्वीकारले, माझ्यावर प्रेम केले त्यांच्या ऋणी आहे. आज मी जो काही आहे ती या सर्वांमुळे आहे.

ही 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मी द नाईट मॅनेजर भाग 2 आणि अ‍ॅनिमल या दोन कलाकृतींच्या माध्यमातून खास अवतारात तुमच्यासाठी येत आहे. मला आशा आहे की तुम्ही नेहमीच माझ्यावर प्रेम आणि माझे समर्थन करत राहाल.'

अनिल कपूर यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. शिल्पा शेट्टी, फराह खान, जितेंद्र जोशी, हृतिक रोशन, बोनी कपूर, गुरु रंधावा, पद्मिनी कोल्हापुरे अशा अनेक दिग्गजांनी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT