मनोरंजन बातम्या

The Night Manager Trailer: 'द नाईट मॅनेजर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, भारतीय गुप्तचर यंत्रणेवर आधारित आणखी एक कलाकृती

अनिल आणि आदित्य यांची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलरच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Pooja Dange

The Night Manager Trailer Out: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'द नाईट मॅनेजर' या वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तर आदित्य रॉय कपूरची भूमिका सुद्धा दमदार असणार आहे. 'द नाईट मॅनेजर' हा याच नावाच्या हॉलिवूड वेबसीरीजचा रिमेक आहे, जो एका कादंबरीच्या कथेवर आधारित आहे. अनिल आणि आदित्य यांची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलरच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

'द नाईट मॅनेजर'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला आदित्य रॉय कपूर स्वतःला बर्फापासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहे अशी होते. यानंतर अनिल कपूरच्या शैलेंद्र 'शेली' या पात्राशी तुमची ओळख होते, जो शस्त्रास्त्रांचा व्यापारी आहे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आहे. पण तो कधीच पकडला जाणार नाही याची त्याला खात्री आहे. मग आदित्य त्याच्या कुटुंबात प्रवेश करतो. आदित्य म्हणजेच शान सेनगुप्ता हा एक गुप्तहेर आहे जो हॉटेलमध्ये नाईट मॅनेजर म्हणून काम करतो.

ट्रेलरबद्दल माहिती देताना अनिल कपूरने म्हणले की, 'एक शस्त्र विक्रेता, नाईट मॅनेजर, प्रेम आणि फसवणुकीचा हा धोकादायक खेळ आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर १७ फेब्रुवारीपासून 'द नाईट मॅनेजर'चे स्ट्रीमिंग होणार आहे. या वेबसीरीजच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे काही लोकांचे म्हणणे आहे की, हॉलिवूड वेबसीरीजचा रिमेक करण्याऐवजी बॉलिवूडने स्वतःचे काहीतरी आणले पाहिजे.

संदीप मोदी दिग्दर्शित ही वेबसीरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर १७ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. या वेबसीरीजमध्ये अनिल कपूरशिवाय आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी, अरिस्ता सिंग मेहत, तिलोत्तमा शोम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT