Ananya Pandey SaamTv
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey: अनन्याच्या 'या' कृत्याचे होत आहे कौतुक, पापाराझीवर...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अनन्या पांडेचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ananya Pandey Viral Video: अनन्या पांडेने ३० ऑक्टोबरला तिचा २४वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानिमित्त तिने डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला आर्यन खान, सिद्धांत चतुर्वेदी, नव्या नंदा यांचा समावेश होता. पार्टी संपल्यावर अनन्या कारकडे जात असताना एक फोटोग्राफर अडखळून पडला. अनन्याने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनन्या पांडेचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

अनन्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पापाराझीला “संभाल के, संभाल के” (सांभाळून सांभाळून)असे म्हणाली आहे. मग तिने त्याला विचारले, "तुम ठीक हो ना (तू ठीक आहेस ना ?)" त्यानंतर तिने पापाराझीला मदत करण्यासाठी तिचा हात सुद्धा पुढे केला. तिच्या या कृत्याची सगळीकडे प्रशंसा होत आहे. एका चाहत्याने त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, “अनन्या खरोखर एक दयाळू मुलगी आहे,” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, “मला तिचा हा स्वभाव आवडतो'. (Viral Video)

भारतातील वाढत्या पॅप संस्कृतीवर सेलेब्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी फोटो काढताना एखादा फोटोग्राफर पडावा अशी इच्छा व्यक्त केली होती. नव्यासोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झालेल्या जया यांना कार्यक्रमात पापराझींची उपस्थिती आवडली नव्हती. जया बच्चन यांचे फोटो काढताना पापराझी अडखळला, त्यावर जया म्हणाल्या, 'असाच झालं पाहिजे. मला आशा आहे की तू पुढच्या वेळी तोंडावर पडशील!' (Bollywood)

अनन्या विजय देवरकोंडा सोबत 'लिगर' चित्रपटात दिसली होती. अनन्या पांडे अनेक चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. अनन्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गए हम कहा' आणि आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. (Ananya Pandey)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजपला 'दे धक्का', बड्या नेत्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

Printed Kurta Sets: कम्फर्टेबल फिटींग आणि स्टायलिश लूकसाठी आजच 'हे' प्रिंटेड कुर्ता सेट ऑर्डर करा

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

Skin Care Tips: बटाटा त्वचेवर लावल्याने होतील 'हे' साइड इफेक्ट्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT