Aditya Roy Kapoor Ananya Pandey Spotted At Goa Airport Instagram
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey - Aditya Roy Kapoor Spotted: बॉलिवूडचे नवं कपल! आदित्य-अनन्याचं गोवा व्हेकेशन संपलं; एअरपोर्टवर एकत्र झाले स्पॉट

Bollywood New Couple: अनन्या आणि आदित्य रॉय कापुर गोवा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले आहेत.

Pooja Dange

Aditya Roy Kapoor Ananya Pandey Spotted At Goa:

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे बॉलिवूडमधील नवीन जोडपे आहे. युरोपमधील व्हेकेशन असो किंवा चित्रपटांचे स्क्रिनिंग हे जोडपे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहे. नुकतेच हे जोडपे गोव्यातील समुद्रकिनारी त्यांच्या सुट्टीचा आनंद घेल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अनन्या आणि आदित्य रॉय कापुर गोवा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांनीही त्यांचे चेहरे मास्कने झाकले होते. यावेळी आदित्यने फुल स्लीव्जचा व्हाईट टीशर्ट घातला होता तर ब्लॅक पॅन्टने पेअर केले होते. अनन्याने क्रिम कलरचा टॉप आणि फेडेड जीन्स घातली होती. तर अनन्याने मेसी बन बांधला होता.

गेल्या महिन्यात आदित्य रॉय कपूरने अनन्यासोबत स्पेन आणि पोर्तुगालमध्ये घालवलेल्या सुट्ट्यांबद्दल सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला, "मला ब्रेकची खूप गरज होती. मी पावसाळ्यात कुठे गेलो नाही, मला मुंबईतला पावसाळा खूप आवडतो."

अनन्यासोबतच्या त्याच्या लीक झालेल्या फोटोंबद्दल विचारले असता, आदित्यने उत्तर दिले: “मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही ही चांगली गोष्ट आहे. पण मी हे नक्कीच ऐकले आहे..." 2022 मध्ये क्रिती सॅननच्या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या.

आदित्य रॉय कपूर नुकताच 'द नाईट मॅनेजर' या थ्रिलर वेबसीरीजमध्ये दिसला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या वेबसीरीजमध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर , शोभिता धुलिपाला, तिलोतमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी यांनी महत्तवाच्या भूमिका केल्या होत्या. आदित्य रॉय कपूरने मृणाल ठाकूरसोबत गुमराह या थ्रिलर चित्रपटातही काम केले होते.

अनन्याचा ड्रीम गर्ल 2 हा कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने आयुष्मान खुरानासोबत काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या 'खो गये हम कहा'मध्ये देखील अनन्या दिसणार आहे. या चित्रपटात आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT