Ananya Panday Boyfriend Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Panday Boyfriend: कोण आहे अनन्या पांडेचा 'मिस्टर वर्ल्डवाइफ', बहीण रईसाच्या कमेंटमुळे झाली गडबड

Ananya Panday: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव बऱ्याच काळापासून मॉडेल वॉकर ब्लँकोसोबत जोडले जात आहे. दरम्यान, ब्लँकोने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यावर अभिनेत्रीची बहीण रायसा पांडेने कमेंट केली आहे.

Shruti Vilas Kadam

Ananya Panday Boyfriend: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे २०२४ हे वर्ष व्यावसायिक आणि वैयक्तिक दृष्ट्या खूप छान गेले. आता तिच्या लव्ह लाइफबद्दल एक बातमी समोर येत आहे. अनन्या पांडे वॉकर ब्लँको नावाच्या व्यक्तीला डेट करत असल्याचे वृत्त आहे तिने या नात्याला पुष्टी किंवा नकार दिलेला नाही. फिल्मफेअरला दिलेल्या एका खास मुलाखतीत, तिने लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिपबद्दल ल उघडपणे तिचे मत मांडले. तसेच काही दिवसांपूर्वी तिच्या बहिणीने वॉकर ब्लँकोच्या एका फोटोवर कमेंट केली. तेव्हापासून ती रेलशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनन्या म्हणाली, “मला खरंच वाटते की लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिप असणे खूप चांगले आहे. मला वाटते की ४५ दिवस आपल्या प्रियकराला न भेटणे ही काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे त्या दोघांनाही एकमेकांची ओढ लागलेली असते.

अनन्याने वॉकरच्या नवीनतम पोस्टवर टिप्पणी करत "मिस्टर वर्ल्डवाइड" असे लिहिले. दरम्यान, अनन्याची बहीण रायसा पांडेनेही त्याच पोस्टवर कमेंट करून 'तू खूप छान आहेस'असे लिहिले. हॉलिवूड मॉडेलच्या फोटोवर पांडे बहिणी प्रेमाचा वर्षाव करताना पाहून चाहत्यांना असे वाटते की यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हापासूनच अनन्या आणि वॉकरमध्ये डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अनन्या येत्या काळात अक्षय कुमारसोबत 'केसरी- चॅप्टर २' मध्ये दिसणार आहे. अलिकडेच चित्रपटातील त्याचा लूक व्हायरल झाला. याशिवाय, तिच्याकडे किल फेम लक्ष्य लालवानीसोबत 'चांद मेरा दिल' हा चित्रपट आहे जो करण जोहर निर्मित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT