Ananya Pandey And Aditya Roy Kapoor Instagram
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 8: ‘प्यार ही दोस्ती है’, अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरसोबतच्या अफेअरविषयी सोडलं मौन

Koffee With Karan 8 Latest Episode News: अनन्याने 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर अनन्या आणि आदित्य यांच्या रिलेशनची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Ananya Pandey And Aditya Roy Kapoor Relationship

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते. अनेकदा त्यांना पापाराझींनी एकत्र स्पॉट झालेले आहेत. पण तरीही त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेची जोरदार चर्चा होत आहे. नुकतंच तिने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करणने त्याच्या खास शैलीमध्ये अनन्याला तिच्या आणि आदित्यच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारलं. यावेळी तिने आदित्यसोबतच्या रिलेशनवर भाष्य केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉफी विथ करणच्या या लेटेस्ट एपिसोडमध्ये, अनन्या पांडे आणि सारा अली खानने एकत्रित हजेरी लावली होती. कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करण जोहरने अनन्या पांडेला, आपल्या नात्याला नाकारणे हे आधीच्या सीझनसारखं नाही का? असा प्रश्न विचारला.

त्या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, "आपल्या रिलेशनशिपला नाकारायला हवं किंवा स्विकारायला हवं, याबद्दल मी भाष्य करणार नाही. ज्या गोष्टी करताना आपल्याला योग्य वाटते, तेच आपण करावे. मला वाटतं, काही गोष्टी खासगी आहेत आणि त्या तशाच ठेवायला पाहिजेत." (Bollywood)

नंतर करण जोहरने पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला आहे, मग तू आदित्य कपूरसोबत फ्रेंड झोनमध्ये आहेस का?, की यापेक्षा काही जास्त आहे? करणच्या या प्रश्नावर, अनन्याने खूप सुंदर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 'मित्र नाही, पण खूप चांगले मित्र आहोत...' पुन्हा एकदा करणने अनन्याला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. "प्यार ही दोस्ती है" असं करण म्हटल्यावर अनन्या लाजून चुर झाली होती. करणच्या प्रश्नावर उत्तर देताना अनन्या म्हणाली की, "आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स आहोत". (Social Media)

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील डेटिंगच्या चर्चा ‘कॉफी विथ करण’च्या गेल्या सीझनपासून होत आहे. या जोडीचे सोशल मीडियावर ट्रीप दरम्यानचे, कॅमेऱ्यात स्पॉट झालेले फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. अनन्या आणि आदित्य यांच्यामध्ये जवळपास १३ वर्षांचा फरक आहे. आदित्य ३६ वर्षांचा तर अनन्या केवळ २३ वर्षांची आहे. दोघांच्याही कामाबद्दल सांगायचे तर, अनन्या ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, तर आदित्य सारा अली खानसोबत ‘मेट्रो इन दिन’ मध्ये दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT