Liger Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

विजय देवरकोंडाचा जबरदस्त ॲक्शनपट ‘लायगर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Liger Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Devarakonda) आगामी चित्रपट ‘लायगर’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याच्या लायगर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे (Ananya Pandey) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने (Karan Johar) नुकताच या चित्रपटाचा नवीन पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटात विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. लायगरच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येत आहेत. विजयने सोशल मीडियावर या ट्रेलरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडा यात जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये विजय अडखळत फक्त 2-3 डायलॉग बोलतो. पण या दोन तीन डायलॉगमध्येच तो मन जिंकून घेतो. त्याने आपल्या किकबॉक्सिंगने सर्वांना वेड लावले आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन विजयच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अनन्या आणि विजयचा रोमान्सही दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा डॅशिंग अंदाज थक्क करणारा आहे.

लायगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अनन्याचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट आहे. २०२१च्या फेब्रुवारीमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT