Anant-Radhika Weeding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नामुळं लाखोंना रोजगार; भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम

Apurva Kulkarni

अनंत आणि राधिकाचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे.. त्यांच्या कपड्यापासून ते लग्नाच्या अरेंजमेंटपर्यंत संपुर्ण देशाचं लक्ष फक्त राधिका आणि अनंत यांच्या लग्नाकडे आहे. परंपरा आणि आधुनिकेद्वारे होणारं हे लग्न अर्थव्यवस्थेला चालना देत आहे.

अनंत (Anant Ambani) आणि राधिकांच्या विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीनं जरी होत असला तरी जागतिक स्तरावर त्याच्या चर्चा रंगत आहे. मोठ्या प्रमाणावर जागतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये भव्यदिव्य अशा लग्नाआधीच्या उत्सवाला सुरुवात झाली.ज्यामुळे जामनगरची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. जामनेरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले, आणि जागतिक नकाशावर जामनगरला सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व देत एक वेगळं स्थान निर्माण झालं.

या भव्य कार्यक्रमाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय सकारात्मक परिणाम(effects) झाला आहे. लग्नाआधीच्या एका उत्सवांसाठी, सहा महिन्यांसाठी का होईना, १००,००० हून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या. यामध्ये शेफ, कारागीर, ड्रायव्हरपासून सर्वांना रोजगार निर्माण झाला. संगीताच्या कार्यक्रमासाठीही कोट्यवधीचे ड्रेसेस डिजाईन करण्यात आले. त्याचबरोबर देश-विदेशातील राजकीय लोक, उद्योगपती, चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या लोकांना आमंत्रित करत देशातील पारंपारिक विविधता जागतिक पातळीवर नेण्यात आली.

शिवाय, या लग्नामुळे पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक परिणाम झाला. विदेशातील पाहुण्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी ५०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती.. अनंत राधिकाच्या लग्न(Weeding) सोहळ्यामुळं स्थानिक पायाभूत सुविधांना मोठी चालना दिली, हजारो नोकऱ्या निर्माण करून दिल्या, पर्यटनाला चालना दिली गेली, तसंच जामनगरच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून जामनगरची नव्यानं ओळख निर्माण झाली.

आता उत्सुकता आहे ती राधिका(Radhika) आणि अनंत यांच्या लग्न सोहळ्याची. १२ ते १४ जुलैदरम्यान मुंबईत भव्य लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यामुळं जामनेरप्रमाणेच मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर सकारत्मक परिणाम होईल अशी आशा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT