Radhika Merchant  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Radhika Merchant : अंबानींच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक अन् राधिका मर्चंटचा डान्स, पाहा VIDEO

Anant Ambani And Radhika Merchant Dance : अंबानी कुटुंबाने नाचत आणि गाताना बाप्पाला निरोप दिला. अनंत आणि राधिकाचा ढोल ताशाच्या तालावर नाचताना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र गणेश उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश उत्सव जगभरात आनंदाने साजरा केला जातो. ७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. तेव्हापासून सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र बाप्पाची १० दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनेक कलाकार आणि उद्योगपतींच्या घरी देखील गणपती येतात. यावेळी मुंबईतील निवासस्थानी अंबानी कुटुंबीयांनी अँटीलिया गणपतीचे स्वागत केले .

अंबानी कुटुंब नेहमीच आपली संस्कृती फॉलो करताना दिसते. नुकतेच अंबानीच्या मुलाचे म्हणजे अनंत अंबानीचे लग्न झाले. नवीन सून घरात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव अंबानी कुटुंबीयांसाठी खूप स्पेशल होता. अंबानी कुटुंब गणेश चतुर्थी नेहमीच उत्साहात साजरी करत. राधिका मर्चंटचा हा पहिला गणेशोत्सव आहे.

अंबानी कुटुंब ८ सप्टेंबरला अँटीलिया गणपती विसर्जनात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. काल त्यांचा हा दीड दिवसाचा अँटीलियाचा बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन सोहळ्यात नीता अंबानी, राधिका मर्चंट दोघीही आनंदी नाचताना दिसले. नीता अंबानी यांनी आकर्षक गुलाबी साडी परिधान केली होती. त्या साडीला शोभेल असे मॅचिंग ज्वेलरी परिधान केली होती. यावर त्यांनी मिनिमल मेकअप देखील केला होता. त्यांच्या या सुंदर सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नीता अंबानी यांनी बाप्पाच्या मूर्तीसोबत विसर्जनाला जाताना गणेश भक्तांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. त्यांनी खूप आनंदाने गणेश भक्तांचे स्वागत केले. अँटीलिया राजाच्या गणपती विसर्जन सोहळ्यात आलेल्या सर्व भक्तांसाठी प्रसाद वाटप करण्यात आल होत. या गणपतीचे विसर्जन गिरगांव चौपाटीला करण्यात आले.

या विसर्जन सोहळ्यातील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या नवविवाहित जोडप्याचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते ढोल-ताशांच्या गजरात नाचताना पाहायला मिळाले. हे नवविवाहित जोडपे विसर्जन सोहळ्यात फार आनंदी दिसले. गुलालीची उधळण करत दोघे जबरदस्त डान्स करत होते. राधिकाने या खास दिवसासाठी निळ्या रंगाचा शॅार्ट कुर्ता परिधान केला होता आणि दुसरीकडे अनंतने केशरी रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. या जोडप्याच्या चेहऱ्यावरील हास्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT