Anand Mahindra Praises Shahrukh khan Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anand Mahindra Impressed SRK Dance: किंग खानच्या वयाला तोड नाहीच! Zinda Banda च्या गाण्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांनाही पडली भूरळ

Anand Mahindra Praises Shahrukh khan Video Viral: महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शाहरूख खानच्या ‘जिंदा बिंदा’च्या निमित्ताने एक ट्वीट केलं आहे. आता त्या ट्विटला किंग खानने उत्तर दिलं आहे. सध्या ते उत्तर सर्वत्र चर्चेत आलं आहे.

Chetan Bodke

Anand Mahindra On Jawan New Song

ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा सुरू आहे. ‘पठान’नंतर ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर शाहरूख अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होत आहे.

‘पठान’ प्रमाणेच ‘जवान’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. नुकतंच ‘जवान’मधलं ‘जिंदा बिंदा’ हे गाणं प्रदर्शित झालं. सध्या हे गाणं सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

नुकतंच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शाहरूख खानच्या ‘जिंदा बिंदा’च्या निमित्ताने एक ट्वीट केलं आहे. आता त्या ट्विटला किंग खानने उत्तर दिलं आहे. सध्या ते उत्तर सर्वत्र चर्चेत आलं आहे.

सध्या गाण्यातील अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अनेक युजर्स या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत. शाहरूखच्या डान्सचे आणि डायलॉगचे कौतुक सध्या नेटकरी सोशल मीडियावर करीत आहे. सोशल मीडियावर गाण्याला वाढता प्रतिसाद पाहता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शाहरूख खानच्या ‘जिंदा बिंदा’ या गाण्यावर एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये आनंद महिंद्राने स्तुतीसुमने उधळली आहेत. महिंद्रा यांनी एक ट्वीट करत शाहरुखचे तोंडभरून कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी देखील अनेकदा बॉलिवूड गाण्यांचे कौतुक केले आहे. यावेळी उद्योगपती आनंद महिंद्राने चित्रपटातील ‘जिंदा बिंदा’ या गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. शेअर करताना कॅप्शन दिले की, “हा अभिनेता खरंच ५७ वर्षांचा आहे का? त्याच्या वाढत्या वयाची प्रक्रिया गुरुत्वाकर्षण शक्तीला आव्हान देत आहे! तो इतर लोकांपेक्षा दहा पटीने जिवंत आहे. #ZindaBanda हो तो ऐसा…” असं त्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. या ट्वीटला आता शाहरूख खानने प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरूख खानने आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं की, “आयुष्य खूप लहान आणि वेगवान आहे सर, फक्त त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. जे काही लागेल तेवढे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय.” हे गाणं १ ऑगस्टला प्रदर्शित झालं असून या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. गाण्याला आतापर्यंत १.१ मिलियन व्ह्यूज मिळाले असून १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कमेंटच्या माध्यमातून शाहरूखला प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे, तर त्याच्या पाठीवर कौतुकाची ही थाप दिली आहे. ‘जवान’चं दिग्दर्शन ॲटली कुमारने केले असून चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली आहे. प्रमुख भूमिकेत शाहरुख खानसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा दिसणार आहे. तसेच दीपिका पादुकोण या चित्रपटात पाहुणी कलाकार दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: रोहित-श्रेयस-अक्षरनंतर डेथ ओव्हर्समध्ये हर्ष‍ित राणाची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियासमोर 265 रन्सचं आव्हान

Mumbai To Shegaon Travel: मुंबईवरून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाताय? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स

Maharashtra Live News Update: भाऊबीजेनिमत्त ठाकरे बंधू एकत्र बहिणीच्या घरी दाखल

Shivani Rangole Photos: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्रीचा दिवाळी स्पेशल लूक, साडीतील फोटोत दिसतेय सुंदर

एका महिन्यात घटवू शकता २-३ किलो वजन; 'या' सोप्या टीप्सचा करा वापर

SCROLL FOR NEXT