Rushi kapoor birthday INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Ridhhima kapoor shared Post On Father's Birthday : वडील ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी लेक रिद्धिमाची भावुक पोस्ट

Baby Raha is Mini You "बेबी राहा अगदी तुमच्यासारखी आहे", म्हणत रिद्धिमा कपूरने फोटो पोस्ट करून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

"हॅपी बर्थडे पापा... तुम्ही इथे असता तर आज तुमच्या दोन्ही नातींसोबत बर्थडे सेलिब्रेट केला असता. तुमची बंदरी सॅम आता मोठी झाली आहे आणि बेबी राहा खूप क्यूट आहे. ती अगदी तुमच्यासारखी आहे.'' असे लिहीत अभिनेता ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त लेक रिद्धिमा हिने वडिलांचा फोटो सोशल मिडियावर बुधवारी शेअर केला आहे.

बॉलिवूडच्या या हँडसम अभिनेत्यावर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. ७०-८०चं दशक गाजवलेल्या ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेक रिद्धिमा कपूरने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची लेक समायरा आणि ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी कपूर आणि समायरा बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसत आहेत. या फोटोला रिद्धिमाने खास कॅप्शनही दिलं आहे. त्यात पुढे तिने लिहिले आहे की, "तुमच्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मी सेलिब्रेट करते. आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासाठी आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं आहे", असं कॅप्शन या फोटोला तिने दिलं आहे.

रिद्धिमाच नाही तर नीतू कपूर यांनी देखील ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलेल्या ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० रोजी निधन झालं. पण, अभिनयाने एक काळ गाजवणारे ऋषी कपूर आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT