बिग बॉस आणि सलमान खान हे आता एक समीकरणच झालंय. रिऍलिटी शो बिग बॉस 2006 पासून सुरु झाले. सलमान खानने 2010 पासून 'बिग बॉस' होस्ट करायला सुरुवात केली. बिग बॉसला सलमानची आणि सलमानला बिग बॉसच्या मंचाची आता जणू सवयच झाली आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनसोबत सलमान खानची फी वाढत गेली आहे. या रिऍलिटी शोच्या सातव्या सीझनमध्ये तर सलमानची फी दुप्पट झाली.
सातवा सीझन होस्ट करण्यासाठी सलमानने प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटी रुपये इतके मानधन घेतले. सीझन 9 मध्ये 7 कोटी रुपये मानधन सलमानने घेतलं. तर बिग बॉसच्या 10 व्या सिझनच्यो होस्टींगसाठी सृलमाननं आकारलेले मानधन होते ८ कोटी रुपये.
बिग बॉसच्या 15 व्या सीझनसाठी सलमानने 350 कोटी रुपये मानधन घेतले. आता बिग बॉसचा 18 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
या रिऍलिटी शोची टिमही चांगलीच नव्या सिझनसाठी चांगलीच मेहनत घेते आहे. तसा अजून या सिझनला अवकाश आहे.
आता आधीच्या सगळ्या सिझन्सप्रमाणेच 18 वा सिझनही नाट्यमय आणि विवादीत असणारे यात शंका नाही. पण, बिग बॉसचा 18 वा सिझन येणार या चर्चेसोबतच सलमानला घेऊन आणखी एका विषयाची चर्चा होतेय. ती या सिझनसाठी सलमानला दिल्या जाणाऱ्या मानधनाची. 18 वा सिझनसाठी सलमाननं आपल्या मानधनात वाढ केली आहे.
18 व्या सिझनसाठी सलमाननं सुमारे 60 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे. काय ? ऐकून धक्का बसला ना ? सलमानचं हे मानधन एक सिनेमाच्या बजेट इतकं आहे म्हणा ना. त्यामुळं आता बिग बॉसचे आगामी काळात आणखी नवीन सिझन आले तर सलमानच्या मानधनाचा आकडाही चढत गेला तर आश्चर्य वाटायला नको.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.