KBC 16 contestant Bunty : केबीसीत १ करोडच्या प्रश्नावर पोहोचलेला बंटी नेमका आहे तरी कोण ?

Bunty Says His Parents Never Compromised On His Education : आई-वडिलांनी शिक्षणात कधीच तडजोड केली नाही; बैतुलच्या असडी गावातील आदिवासी बंटीने सांगितली आपली गोष्ट
KBC 16 First Adivasi Contestant
KBC 16 First Adivasi ContestantSaam TV
Published On

KBC 16 update : मध्य प्रदेशातील बैतुलच्या असडी गावातील बंटीने कोन बानेगा करोडपतीच्या १६ व्या सीजनमध्ये १ करोडच्या प्रश्नपर्यंत जात उत्तम कामगिरी केली आहे. आदिवासी बंटीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. बंटीच्या गावात शहरी भागा इतक्या सुविधा नाहीत, त्याच्या गावातील लोक कमी शिकलेले आहेत. अशा परिस्थितीत त्याचा केबीसी पर्यंतच्या प्रवासाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

बंटीने मध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याचे शिक्षण बीसीए पर्यन्त झाले आहे. सध्या तो मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत ग्रेड ३ च्या पदासाठी तयारी करत आहे. त्याचे आई-वडीलही फारसे शिकलेले नाहीत. मात्र त्यांनी बंटीच्या शिक्षणात कोणतीच तडजोड केली नाही. काम करणाऱ्या माणसांची जीवनशैली वेगळी असते. नोकरी करणारे कोणी घरात असेल तर पुढच्या पिढीसाठी देखील ते चांगले असते असे त्यांचे मत असल्याचे बंटीने सांगितले.

KBC 16 First Adivasi Contestant
Kandahar Plane Hijack : वेब सिरीज IC-814 वादाच्या भोवऱ्यात, कंदहार हायजॅकची खरी कहाणी काय? वाचा सविस्तर

केबीसीची तयारी कशी केली ?

बंटी १ करोडच्या प्रश्नपर्यंत जाऊन पोहोचला असल्याने संगळ्याना त्याच्या हुशारीचे कौतुक वाटत आहे. त्याने केबीसीची तयारी कशी केली हा प्रश्न त्याला आता सारखा विचारला जात आहे. त्यावर उत्तर देताना बंटीने सांगितले की, तो २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याला केबीसी बघायला आवडायचे. त्याने यु ट्यूब वरून केबीसीचे सगळे जुने भाग पाहून स्वत:च्या ज्ञानाचे आकलन केले आहे, असे बंटी म्हणाला.

KBC 16 First Adivasi Contestant
Suraj Chavan Life story: गावाने वेड्यात काढलं, गणपतीसाठी राब राब राबला; सूरज आता गुलिगत चमकतोय, पण संघर्ष डोळ्यात पाणी आणेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com