सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि नवनवीन प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचं मन जिंकते. यंदाचा गुढी पाडवा तिच्यासाठी खास आहे कारण ती तो स्वतःच्या नव्या घरात "एकम" मध्ये साजरा करत आहे.
मुंबईत अमृताने अलीकडेच स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. अमृता सांगते, "गुढीपाडवा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा सण आहे. दिवाळीनंतर हा माझ्यासाठी सर्वात खास सण आहे. लहानपणापासून बाबांनी शिकवलेली गुढीची महत्त्वाची शिकवण आजही माझ्या मनात आहे. 'गुढी आकाशाला भिडली पाहिजे' ही शिकवणच माझ्या आयुष्याची दिशा ठरली."
नव्या घराविषयी ती म्हणते, "एकम हे माझं खरंखुरं घर आहे. येथे केवळ माझी जागा मिळाली असं नाही, तर मी स्वतःला सापडली आहे. या घराने मला नवी उमेद, आत्मविश्वास, आणि स्थैर्य दिलं आहे."
अमृता लवकरच सुशीला - सुजीत या चित्रपटात पहिल्यांदाच आयटम साँग करताना दिसणार आहे. तसेच, अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये तिच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. यंदाचा गुढी पाडवा अमृतासाठी नवी सुरुवात घेऊन आला आहे, आणि तिच्या नव्या स्वप्नांचा प्रवास आता आणखी तेजस्वी होणार आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.