Amruta Khanvilkar Yoga Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar Yoga Video: यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास! निसर्गात गवसला मंत्रमुग्ध करणारा अनुभव

Amruta Khanvilkar celebrate International Yoga Day: बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने यंदाचा योग दिवस एक खास अनुभवात रूपांतरित केला. शहरापासून दूर, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र केदारनाथधामात अमृताने योग साधना करत योग दिन साजरा केला.

Tanvi Pol

रोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे आणि अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर ही फिट राहण्यासाठी योग करताना दिसते आणि तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे हे आजवर तिने अनेक मुलाखती मधून देखील सांगितलं आहे.

जगभरात कुठेही ती फिरत असली तरी रोजच्या दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस(Yoga Din) अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. योगायोग म्हणजे अमृताची केदारनाथ ट्रीप आणि हा योग दिवस यांचा उत्तम योग जुळून आला असं म्हणणं वावग ठरणार नाही.

केदारनाथच दर्शन घेऊन अमृताने हा योग दिवस अगदीच वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. तिचा फिटनेस मंत्रा हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. हा योग दिवस आणि केदारनाथ मंदिरात जाऊन घेतलेलं दर्शन या बद्दल बोलताना अमृता सांगते ....

गेल्या काही वर्षांत योगाचा सराव करताना एक गोष्ट माझ्या हृदयात खोलवर उतरली आहे ती म्हणजे"Yoga is not just about movement of the body it’s equally about the stillness of the mind. शांतता आपल्याला अधिक समजूतदार बनवते आपले निर्णय घ्यायला आणि ते स्वीकारायला शिकवते आणि जे आपल्याला पुढे नेत नाही, त्याला सौम्यतेने सोडून द्यायचं धैर्य देते.

यंदा मात्र मनात वेगळीच ओढ होती. दैनंदिन सराव जितका महत्त्वाचा आहे. तितकंच अधूनमधून सर्व काही बाजूला सारून स्वतःसाठी एखादा अनुभव शोधायला निघणंही आवश्यक असतं. एक असा अनुभव जो आपल्याला अधिक खोलवर रुजवतो आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे केदारनाथ यात्रा.

केदारनाथ (Kedarnath) यात्रेत खरी जादू तेव्हा घडली सकाळी साडेतीन वाजता, ब्रह्ममुहूर्तावर आम्हाला केदारनाथ मंदिरात दर्शन मिळालं ! बाहेर येऊन योगासन करत हा सुंदर क्षण अनुभवायला मिळणं अगदीच स्वप्नवत होत. प्रत्येकासाठी केदारनाथ वेगळं असतं.प्रत्येकाला भेटतो तिथे आपलाच एखादा जादुई क्षण.

माझा क्षण मला मिळाला. आता तो क्षण मी माझ्यासोबत घेऊन परतले आहे माझ्या श्वासात, माझ्या साधनेत आणि माझ्या प्रत्येक शांत अस्तित्वात. अमृताने या यात्रेत फक्त केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही तर तिच्या योग साधनेचा एक नवा अध्याय तिने तिकडे जाऊन अनुभवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचे कोड नेम काय होते? प्रत्येक भारतीयाला या १० गोष्टी माहित असायला हव्यात

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT