Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra Love Story Instagram
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar Birthday: अमृता- हिमांशूची कशी जुळली रेशीमगाठ?, सक्सेस लव्हस्टोरीनंतर राहतात वेगळे

Amruta Khanvilkar Birthday: आपल्या ठसकेबाज आणि बहारदार नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमृताचा सिनविश्वामध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.

Chetan Bodke

Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra Love Story

चंद्रा म्हणून सर्वत्र प्रकाशझोतात आलेल्या अमृता खानविलकरचा आज ३९ वा वाढदिवस. आपल्या ठसकेबाज आणि बहारदार नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमृताचा सिनविश्वामध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. वाजले की बारा आणि चंद्रा या दोन लावण्यांमुळे तिला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तिने फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण करीत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमृताचा २३ नोव्हेंबर १९८४ साली जन्म झाला. तिने आपल्या फिल्मी कारकिर्दित अनेक हिट आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. अमृता जेवढी खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. तितकीच ती आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. तिने बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांचीही २००४ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या डान्स रिॲलिटी शोच्या सेटवर भेट झाली. दोघांनीही एकमेकांना तब्बल १० वर्षे एकत्र डेट केल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. (Bollywood)

जरीही असं असलं तरी ते दोघेही एकमेकांपासून दुर राहतात. अमृता मुंबईमध्ये राहत असून तिचा पती हिमांशू दिल्लीमध्ये राहतो. दोघेही आपआपल्या कामाप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत आहेत. पण जरीही असं असलं तरी आपल्या कामातून वेळ काढत ते दोघेही क्वालिटी टाईम एकमेकांसोबत स्पेंड करत असतात. जरीही असे असले तरी, ते कायमच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रिल आणि फोटोज शेअर करत राहतात. (Actress)

अभिनेत्री आणि निर्माती म्हणून अमृता खानविलकर मराठी फिल्म इंडस्ट्रिमध्ये सक्रिय आहे. तिने गणपतीच्या शुभमुहूर्तावर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. अमृताने मराठी सिनेसृष्टीत नटरंग, साडे माडे तीन, कट्यार काळजात घुसली, चोरीचा मामला आणि चंद्रमुखी सारख्या हिट चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये राझी आणि सत्यमेव जयते सारख्या चित्रपटातून तिने हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या सोबतच अमृताने ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी सीझन १०’ आणि ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’सारख्या रिॲलिटी शोमधून चमकली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT