Amruta Fadnavis Song Instagram @amruta.fadnavis
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाणं येतंय, गाण्यापेक्षा लूकचीच जास्त चर्चा

अमृता फडणवीस यांचे नवीन वर्षातील नवीन गाणे लवकरच येतेय तुमच्या भेटीला.

Pooja Dange

Amruta Fadnavis New Song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस एक उत्तम गायिका आहेत. अमृता फडणवीस यांची ओळख एका मंत्र्याची बायको इतकी राहिलेली नाही. अमृता फडणवीस यांनी गाण्याने, फॅशनने, सडेतोड बोलण्याने स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. अमृता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावरून त्यांनी याची माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या ही पोस्ट करत त्यांनी त्यांच्या नवीन गाण्याची घोषणा केली आहे. 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !!' असे त्यांच्या नवीन गाण्याचे बोल आहेत. हे गाणे ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'टी सीरीज'ने या गाण्याची निर्मिती केली आहे.

अमृता यांचे हे बॅचलर्स आधारित आहे. अमृता यांचा गाण्यासह त्यांच्या या ट्विटमधील फोटोची सुद्धा चर्चा होत आहे. अमृता यांचा या गाण्यातील लूक अगदीच थोटके आहे. सगळ्यांचे लक्ष त्यांच्या लूकने वेधले आहे. तात्यांनी व्हाईट टॉप आणि जीन्स आणि त्यावर एक हटके जॅकेट घातले आहे. त्यांनी या कपड्यांवर परिधान केलेले दागिने सुद्धा विशेष आहेत. त्यांच्या या लूकमुळे गाणे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक गाणी गायली आहेत. दिवाळीनिमित्त त्यांनी 'जय लक्ष्मी माता' हे गाणे गायले होते. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे कुणी म्हणले 'वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे गाणे प्रदर्शित झाले होते. 'ये नयन डरे डरे' हे गाणे देखील त्यांनी गायले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT