Amruta Fadnavis Song Instagram @amruta.fadnavis
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis New Song: 'अज मैं मूड... अमृता फडणवीसांचं गाणं तुफान हिट; 'इतके' व्ह्यूज की बस्स रे बस्स...

मूड बणालेया' असे अमृता यांच्या गाण्याला एका दिवसात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Pooja Dange

Amruta Fadnavis Got Million Views: अमृता फडणवीस सध्या चर्चेत आहेत. अमृता याचं नवीन गाणे काल प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'मूड बणालेया' असे अमृता यांच्या गाण्याचे नाव आहे. या गाण्याला एका दिवसात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

अमृता फडणवीस यांचे काल म्हणजे ६ जानेवारीला नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. अमृता यांनी हे गाणे मराठी नाही तर पंजाबीमध्ये गायले आहे. 'मूड बणालेया' हे त्यांचे गाणे एक पार्टी सॉन्ग आहे. या गाण्यातील त्यांचे आऊटफिट कमाल आहेत. अमृता फडणवीससह या गाण्यात अविनाश मिश्रा आणि मेहक घई सुद्धा आहेत.

अमृता फडणवीस 'मूड बणालेया' या गाण्याला एका दिवसात १० मिलियन लोकांनी पहिले आहे. अमृता यांचे हे पहिले गाणे नसून त्यांनी याआधी सुद्धा अनेक गाणी गायिली आहेत. त्यांच्या गाण्यांची नेहमीच चर्चा देखील झाली आहे. यावेळी सुद्धा त्यांचे 'मूड बणालेया' हे नवीन गाणे व्हायरल झाले आहे. त्याचसोबत त्यांचे लूक देखील चर्चेत असतात. अमृता नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. परंतु यावेळी मात्र त्यांच्या गाण्या आधी त्यांच्या लूकची सुद्धा खूप चर्चा झाली होती.

अमृता या पेशाने बँकर आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यामुळे त्या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील गाणी प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतात. दिवाळीनिमित्त त्यांनी 'जय लक्ष्मी माता' हे गाणे गायले होते. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे कुणी म्हणले 'वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे गाणे प्रदर्शित झाले होते. व्हेलेंटाईननिमित्त 'ये नयन डरे डरे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला त्या घेऊन आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT