Bigg Boss Daily Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 4: बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीसांची एन्ट्री; 'या' दोन स्पर्धकांनी विचारले खास प्रश्न, दिले सडेतोड उत्तर

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस येणार असून दिवाळीचा सण ही साजरा करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Latest Update: गेल्या वीस दिवसांहून अधिक बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक गुण्या गोविंदाने राहत आहे. सोबतच बऱ्याचदा त्यांच्यात हमरी- तुमरी ही रंगते. अनेकदा टास्क दरम्यानही स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसते. सध्या बिग बॉसच्या घरात दिवाळी निमित्त चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

याआधी बिग बॉसच्या घरात बरेच मंडळी येऊन गेले आहेत. मुंबईचे डब्बेवाले, सोबतच कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी- राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी ही हजेरी लावली होती.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात मेघा घाडगेला कायमचे बाहेर जावे लागले. आता या आठवड्यात कोणता खेळाडू घराबाहेर जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चावडीच्या दुसऱ्या दिवशी 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये “नॉमिनेशन रॉकेट” हे कार्य पार पडले. नॉमिनेशन कार्याअंती किरण माने, अमृता देशमुख, त्रिशूल मराठे , विकास सावंत, योगेश जाधव, आणि प्रसाद जवादे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर जावे लागेल, हे येत्या रविवारी आपल्याला कळेल.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील कावेरी - राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळेने हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर साप्ताहिक कार्य सोपवले. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि त्याची विजेती TEAM A ठरली आहे.

बिग बॉसचे कोणतेही घर असो, दिवाळी जोरात साजरी केली जाते. तर बिग बॉस मराठीच्या घरातही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व टास्कदरम्यान जरी जोरात भांडत असले, तरी काही कार्यक्रमावेळी आनंदात राहतात.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस येणार आहेत. आज घरातील सर्व स्पर्धक अमृता फडणवीस यांच्यासोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत.

बिग बॉसच्या घरात एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस घरात येणार असून त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगणार आहे. सोबतच बिग बॉसच्या घरातील दोन स्पर्धक किरण माने आणि यशश्रीने अमृता फडणवीसांना काही प्रश्न विचारणार आहेत.

यशश्रीने अमृता फडणवीसांना विचारले की, उपमुख्यमंत्र्यांचा फराळातला आवडता पदार्थ कुठला? अमृता फडणवीस म्हणतात त्यांना पोहे खूप आवडतात, मोदक आवडतात, करंजी आवडते. किरण माने यांनी विचारले की, तुम्हाला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असते, पण मला तुम्हांला विचारायचे आहे.

बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे? अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. एकनाथ शिंदे एक कॅप्टन आहेत तर एक देवेंद्र फडणवीस कॅप्टन आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT