Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mood of The Nation poll : अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे शहेनशहा; सलमान, शाहरुख, आमिरलाही टाकलं मागे

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हे अभिनेतेही नेहमी चर्चेत असतात. पण अमिताभ बच्चन नेहमीच नंबर वन होते आणि आजही नंबर वन आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सिनेमा सुपरहिट झाल्यावर प्रकाशझोतात येतात आणि सिनेमा फ्लॉप झाला तर त्यांची क्रेझ कमी होते. पण महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे असे कलाकार आहेत, जे चित्रपट फ्लॉप झाला किंवा हिट झाला तरी नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबतच शाहरुख खान(Shahrukh Khan), आमिर खान(Aamir Khan), सलमान खान(Salman Khan) हे अभिनेतेही नेहमी चर्चेत असतात. पण आजही बिग बींसमोर कोणीही टिकू शकलेले नाही.

अमिताभ बच्चन नेहमीच नंबर वन होते आणि आजही नंबर वन आहेत. केबीसी शो होस्ट करणं असो किंवा सिनेमात काम करणं असो, अमिताभ बच्चन यांचं नाव समोर आलं, तर त्यांची रिप्लेसमेंट कोणीच करू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या ए-लिस्ट कलाकारांची चमक चाहत्यांमध्ये कितपत टिकून आहे, हे जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राने नुकताच एक मूड सर्व्हे केला आहे, ज्याचा निकाल हा आश्चर्यकारक आहे.

सर्वप्रथम या यादीत नाव येते बॉलिवूडच्या किंग खानचे. शाहरुख खान काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब होता. शाहरुख खानने २०१७ साली 'जब हॅरी मिट सेजल' आणि २०१८ साली आलेल्या 'झिरो' सिनेमानंतर प्रमुख भूमिका केली नाही. २०१९ साली, किंग खान सोनम कपूरच्या 'द झोया फॅक्टर' सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. त्यानंतर तो कधी-कधी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग' सेशन्स करताना दिसला.

शाहरुखच्या लोकप्रियतेला गेल्या वर्षी नक्कीच हादरा बसला होता, पण या वर्षी तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात शाहरुखला केवळ ५% लोकांचा पाठिंबा मिळाला होता. परंतु, आता हा आकडा १५% पर्यंत वाढला आहे. शाहरुखच्या आगामी तीन सिनेमांनी (पठाण, डंकी, जवान) त्याला पुन्हा आपले स्थान टिकवून ठेवण्यास मदत मिळाली असली तरी या यादीत शाहरुख दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यानंतर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचे नाव या यादीत येते. यावेळी शाहरुखने तीन चित्रपटांची घोषणा करून अक्षय कुमारला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. अक्षय जवळजवळ प्रत्येक चित्रपट ४० दिवसांत पूर्ण करतो. मात्र यावर्षी त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. बिग बजेट 'सम्राट पृथ्वीराज' असो किंवा कौटुंबिक सिनेमा 'रक्षा बंधन' असो. अक्षय कुमार गेल्या वर्षी वेळी १२ टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु या वर्षी तो १० टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

यासह दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत ९% सह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर पाचव्या क्रमांकावर बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान येतो. या सर्वेक्षणात सलमानला ७% मते मिळाली आहेत. साहजिकच सलमानचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले नव्हते. २०२१ मध्ये आलेला 'राधे' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेतही घट झाली आहे. जर खान्सबद्दल चर्चा सुरू असेल, तर आमिर खानही यापासून लांब नाही, वर्षभरात एकच चित्रपट करणाऱ्या बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नशिबाने यावेळी त्याला साथ दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

SCROLL FOR NEXT