Amitabh Bachchan: बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आहे, त्यापैकी एक म्हणजे मुंबईतील ओशिवरा येथील एक अपार्टमेंट, जे त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये मोठ्या नफ्यात विकले. ३१ कोटी रुपयांना खरेदी केलेली ही मालमत्ता अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटी रुपयांना विकली आहे. ही मालमत्ता ओशिवरा येथे आहे आणि क्रिस्टल ग्रुपच्या १.५५ एकर जागेवर पसरलेले एक सुंदर घर आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांचे अपार्टमेंट विकून १६८% नफा कमावला आहे. स्क्वेअर यार्डच्या विश्लेषणानुसार, बिग बी यांनी एप्रिल २०२१ मध्ये हे डुप्लेक्स अपार्टमेंट ३१ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्याचा विक्री व्यवहार जानेवारी २०२५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. हे आलिशान अपार्टमेंट ५२९.९४ चौरस मीटर क्षेत्रात बांधले गेले आहे, ज्याचे कार्पेट क्षेत्रफळ ५१८५.६२ चौरस फूट आहे. त्यात एक टेरेस देखील आहे, जो ४४५.९३ चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. यात ६ कार पार्किंगची सुविधा आहे. विक्री व्यवहारात ४.९८ कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी नोंदवण्यात आला आहे. तर, नोंदणीसाठी ३० हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.
कृती सॅनन एका अपार्टमेंटमध्ये राहत होती
अमिताभ बच्चन यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये हे अपार्टमेंट कृती सॅननला भाड्याने दिले होते. दरमहा या घराचे १० लाख रुपये भाडे मिळत होते. ६० लाख रुपये या घराचे डिपॉसिटी होते. मुंबई पश्चिमेला असलेले ओशिवरा हे त्याच्या उत्तम जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे या घरात लक्झरी जीवनशैलीशी संबंधित सर्व आधुनिक सुविधा आहेत.
बिग बी यांना ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत
अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या चित्रपटांद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बी पाच दशकांपासून सतत काम करत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी 'शोले', 'दीवार' आणि 'कलकी २८९८ एडी' सारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात चार राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर ट्रॉफींचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.