Amitabh Bachchan: २००७ पासून एकत्र असलेल्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, बच्चन कुटुंबाच्या अनेक जुन्या मुलाखती आणि क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. अशाच एका क्लिपमध्ये २०११ साली झालेल्या मुलाखतीतील अमिताभ यांचे प्रॉपर्टीवरून एक मोठे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलाखतीत, बिग बी यांनी त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या दोन्ही मुलांना - अभिषेक आणि श्वेता बच्चन नंदा यांना समान वाटण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. परिणामी, अभिषेकची पत्नी ऐश्वर्या हिचाही त्यांच्या वारशावर समान हक्क असेल. अमिताभ यांची २०२४ ची एकूण संपत्ती १,६०० कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे.
२०११ साली रेडिफला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, बिग-बी यांनी सांगितले होते की, "माझे निधन झाल्यावर माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या मुली आणि माझ्या मुलामध्ये समान वाटले जाईल - यात कोणताही भेदभाव नाही. जया आणि मी खूप पूर्वी हे ठरवले होते. प्रत्येकजण म्हणतो की मुलगी दिल्या घरची असते, ती तिच्या पतीच्या घरी जाते, पण माझ्या दृष्टीने ती आमची मुलगी आहे; तिला अभिषेकसारखेच अधिकार आहेत."
बॉलिवूडचे "शहेनशाह" म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे पाच दशकांहून अधिक काळ कारकिर्द आहे. या काळाच त्यांनी 'जंजीर' (१९७३), 'दीवार' (१९७५) 'शोले' (१९७५) आणि 'कुली' (१९८३) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले तसेच त्यांनी मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या कल्कि या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आता लवकरच 'रामायण: भाग १' या चित्रपटात ते जटायूची भूमिका साकारणार असल्याचे बोलण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.