Amitabh Bachchan on blue tick  Saam TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Tweet: हात जोडतो... पैसे भरले, आता तरी ब्लू टिक द्या; बिग बींचं ट्वीट

Amitabh Bachchan Tweet On Twitter: खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ट्विटरला ब्लू टिक देण्याची विनंती केली आहे.

Pooja Dange

Amitabh Bachchan Requested Twitter Through Tweet: अनेक दिग्गजांचे ब्लू टिक आज सकाळपासून ट्विटरने काढून टाकले होते. या बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश होता. तर 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या देखील ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक ट्विटरने हटविले होते. या सगळ्याची आज सकाळपासूनच चर्चा होती.

ट्विटरच्या ब्लू टिकचा विषय इतका मोठा होता की 'ब्लू टिक' ट्विटरवर ट्रेंड होत होता. सर्वांना ब्लू टिक गेल्याने धक्का बसला. ब्लू टिक नसल्याने कोणतं खात अधिकृत आहे हे समजणं कठीण जाईल. तसेच यामुळे निर्माण होणारा गोंधळ लक्षात घेऊन सगळे दिग्गज ट्विटरकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागले. यात आता खुद्द अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ट्विटरला ब्लू टिक देण्याची विनंती केली आहे. त्यांनी खास शैलीत एक भन्नाट ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'अहो twitter भाऊ! तुम्ही ऐकताय त का? आता आम्ही पैसेही भरले आहेत... तर ते निळे कमळ ✔️ आहे ना, बरोबर, ते परत ठेवा ना भाऊ, जेणेकरून लोकांना कळेल की आम्हीच आहोत - अमिताभ बच्चन.. तुमच्या समोर हात तर आधीच जोडले आहेत आम्ही. आता काय तुमच्या पाय 👣 पडू ??'

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, मी पैसे भरले आहेत. आता तरी मला ब्लू टिक द्या. जेणेकरून लोकांना कळेल मीच अमिताभ बच्चन आहे. तुमच्या पुढे मी आधीच हात जोडले आहेत. आता पाय पण पडू का?

शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, आलिया भट्ट, बिपाशा बसू, अर्जुन रामपाल, अनुष्का शर्मा, फराह खानसह अनेक राजकीय आणि क्रिडा विश्वातील दिग्गजांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले होते. 

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून, सर्व लेगेसी वेरिफाईड अकॉउंटवरून ब्लू टिक काढून टाकले जाईल. त्याचबरोबर त्यांना या सुविधे हव्या असल्यास त्यांना पैसे मोजावे लागतील. यामुळे आज म्हणजेच 21 एप्रिलला सकाळी अनेकांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

SCROLL FOR NEXT