Rinku Rajguru At Jyotiba Temple
Rinku Rajguru At Jyotiba TempleSaam TV

Rinku Rajguru At Jyotiba Temple: चांगभलं म्हणत रिंकू राजगुरूने घेतलं दख्खनच्या राजाचं दर्शन: व्हिडिओ व्हायरल

Rinku visited Jyotiba Temple In Kolhapur: रिंकूने ज्योतिबाचे दर्शन घेतल्याने तिचे चाहते खूप खुश आहेत.
Published on

Rinku Rajguru Share Video From Jyotiba Temple, Kolhapur: अभिनेत्री रिंकू राजगुरू मेहमीच चर्चेत असते. रिंकू नेहमीच्या तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच रिंकू एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ज्योतीबाला गेल्याचे दिसत आहे. तिच्या कपाळावर गुलाल आहे. तर चांगभलं म्हणत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Rinku Rajguru At Jyotiba Temple
Marathi Movie Chowk Teaser: वाघ आहे वाघ! 'चौक'चा टीझर पाहिला का? येईल 'मुळशी पॅटर्न'ची आठवण

रिंकूच्या या व्हिडिओची सुरुवात ज्योतिबाच्या दर्शनाने होत आहे. तिने पुजाऱ्यांसोबत फोटो देखील काढला आहे. तर या व्हिडिओमध्ये रिंकू अनवाणी फिरताना देखील दिसत आहे. रिंकूने शेअर केलेल्या व्हिडिओ सर्वत्र गुलालाची उधाण झालेली पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये रिंकूची आई, आजी देखील दिसत आहे. कुटुंबासोबत रिंकूने काही कुळाचार, विधी देखील पार पाडले. यावेळी मंदिरात रिंकूचे जोरदार स्वागत झाले. मंदिर प्रशासनाने तिचा आदर सत्कार केला.

रिंकूच्या या व्हिडिओ तिचा सहकलाकार आकाश ठोसरने देखील कमेंट केली आहे. तसेच रिंकूचे चाहते देखील 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं' अशी कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडिओला काही तासात १ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. रिंकूने ज्योतिबाचे दर्शन घेतल्याने तिचे चाहते खूप खुश आहेत. तसेच तिच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

रिंकू राजगुरूने 'सैराट' या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने चित्रपट आणि वेबसीरीजमधून काम करता स्वतःला नेहमीच सिद्ध केले आहे. झुंड, आठवा रंग प्रेमाचा, कागर, मेकअप या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com