Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: 'तुला मराठी येत नाही…”, अमिताभ बच्चन यांची मराठी भाषेबद्दल खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, गुगल ट्रान्सलेट...

Amitabh Bachchan Post: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बिग बी नेहमीचं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात.

Shruti Vilas Kadam

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बिग बी नेहमीचं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी मराठीतून एक खास पोस्ट शेअर केली आणि त्यावरून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेत एक पोस्ट लिहून भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले, कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे.

त्यांच्या या प्रयत्नाचे काहींनी मनापासून कौतुक केले. चाहत्यांनी म्हटले की, "इतक्या मोठ्या कलाकाराने मराठीतून पोस्ट करणं ही अभिमानाची बाब आहे." अनेकांनी त्यांचे आभार मानले आणि मराठीवरील त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे कोैतुक केले.

मात्र, काही नेटकऱ्यांनी या पोस्टवर टिका केली आहे. त्यांच्या मते बच्चन यांनी मराठीत लिहिताना 'गुगल ट्रान्सलेट'चा वापर केला आहे. एक नेटकऱ्याने लिहीले,तुम्ही हे गूगल ट्रान्सलेटरमधून भाषांतर केलं आहे, ते चुकीचं भाषांतर झालं आहे. कारण वाक्यांची रचना आणि शब्दांची बांधणी थोडी चुकीचं वाटत आहे.

एका बाजूला चाहत्यांनी "मराठी भाषेचा सन्मान करणारा हा मोठा उपक्रम आहे" असे म्हणत कौतुकाचा वर्षाव केला, तर दुसऱ्या बाजूला काहींनी "गुगल ट्रान्सलेटपेक्षा प्रत्यक्ष मराठी शिकून लिहिल्यास आणखी चांगलं वाटेल" असा सल्ला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT