Amitabh Bachchan Health Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: बिग बी शूटिंग दरम्यान जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हैदाराबाद येथे एका ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Health Update: बिग बी अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदाराबाद येथे एका ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर शूटिंग देखील रद्द करण्यात आली आहे.

या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली असून हैदराबादमध्ये प्रोजेक्ट 'के'च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचे अभिनेत्याने सांगितले. ॲक्शन शॉट दरम्यान ही घटना घडली. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. अमिताभ यांनी सांगितले की, रिब कार्टिलेज पॉप झाले आहे, उजव्या बाजुच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्यात आली आहे.

हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांचे सीटी स्कॅन करण्यात आले असून तपासणीनंतर बिग बी भारतात परतले आहेत. डॉक्टरांनी बिग बींना सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन अनेक अडचणींचा सामना करत असून त्यांना झालेल्या दुखापतीचा फार त्रास होत आहे. तसेच हालचाल करण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर अपडेट शेअर केले आणि सांगितले की, दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP CM : भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर दिल्लीमध्ये हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी फक्त करा 'ही' कामं; नशीब चमकून मिळेल पैसा

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Redmi 15 5G Launched: दमदार फीचर्ससह शाओमीच्या स्मार्टफोनची एंट्री, Redmi 15 5G मोबाईल भारतात लाँच, किंमत किती?

Teacher Salary: गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार रखडणार, सरकारने वेतन का अडवले? वाचा

SCROLL FOR NEXT