स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छलचं लग्न पुढं ढकलण्यात आलंय
श्रीनिवास मंधाना यांना हृदयाचा झटका, त्यानंतर पलाशही रुग्णालयात दाखल
स्मृती-पलाशच्या संगीत सोहळ्यातील घटनाक्रमक गायकाच्या आईने सांगितला
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छलचं लग्न पुढं ढकलण्यात आलं आहे. दोघांचा संगीत सोहळा २२ नोव्हेंबर रोजी होता. तर त्यांचं लग्न २३ नोव्हेंबर रोजी होतं. परंतु स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयाचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रीनिवास यांच्यानंतर काही तासांनी पलाशला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई अमिता मुच्छल यांनी स्मृती-पलाशच्या संगीत सोहळ्यात रात्री घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.
'हिदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, अमिता मुच्छल यांनी सांगितलं की, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय हा पलाशनेच घेतला. पलाश होणाऱ्या सासऱ्याशी चांगलं बॉन्डिंग आहे. स्मृतीपेक्षाही त्यांच्याशी बॉन्डिंग चांगलं आहे. त्यांना हृदय विकाराचा झटका आला, त्यावेळी स्मृतीच्या आधी पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ते बरे झाल्यानंतर दोघांचं लग्न होईल'.
अमिता मुच्छल यांनी पुढे सांगितलं की, 'हळदीचा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे आम्ही त्याला बाहेर जाऊ दिलं नाही. रडून रडून त्याची तब्येत खराब झाली होती. त्याला ४ तास रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. IV ड्रिप, ECG आणि इतर टेस्ट करण्यात आले. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. परंतु तो तणावात होता'. यावेळी अमिता यांनी पलाशला मुंबईत घेऊन आल्याचेही सांगितलं.
अमिता मुच्छल यांनी खुलासा केला आहे की, 'ते लग्नाच्या एक दिवसआधी खूप आनंदी होते. ते रात्रभर नाचले. इन्स्टाग्रामवर स्टोरीज शेअर करत होते. आम्ही वरातीचा प्लान करत होतो, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला त्यांनी सांगितलं नाही. मात्र त्रास वाढल्याने रुग्णवाहिका बोलवण्यात आली'.
दुसरीकडे पलाश मुच्छलवर स्मृती मंधानासोबत फसवल्याचा आरोप होत आहे. त्याचे सोशल मीडियावर एका महिलेशी चॅटिंग व्हायरल होत आहे. मात्र, हे चॅट खरे आहे का, याबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.