American Stand Up Comedian Reginald Reggie Carroll Shot Dead Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stand Up Comedian Death: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनची गोळ्या घालून हत्या; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Stand Up Comedian Passes Away: अमेरिकेतील लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन रेगिनाल्ड “रेगी” कॅरोल (वय ५२) याचा मिसिसिपी येथे झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Stand Up Comedian Passes Away: अमेरिकेतील लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन रेगिनाल्ड “रेगी” कॅरोल (वय ५२) याचा मिसिसिपी येथे झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. २० ऑगस्ट रोजी साउथेवन परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅरोलला गोळी लागल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आणि त्याला मेम्फिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात ३८ वर्षीय ट्रानेल मारक्विस विल्यम्स याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेगी कॅरोल बॉल्टिमोर येथे स्थायिक होता आणि त्याने अनेक कॉमेडी शोमध्ये भाग घेतला होता. २०२३ साली त्यांनी “Knockout Kings of Comedy” या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निर्मिती केली होती. त्याशिवाय “The Parkers” आणि “Showtime at the Apollo” सारख्या कार्यक्रमांतून त्याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते.

रेगी याच्या निधनानंतर कॉमेडी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री-कॉमेडियन मो’निक यांनी त्याला आपला “कॉमेडीमधील भाऊ” संबोधत श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉल्टिमोरमधील मोबटाउन कॉमेडी क्लबनेही सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लिहिले की, “रेगी हे आमच्यासाठी एक आधारस्तंभ होते, त्यांचे योगदान अमूल्य आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

SCROLL FOR NEXT