Rajabhau More
Rajabhau More Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajabhau More: ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; नाटक पाहतानाच घेतला अखेरचा श्वास...

Chetan Bodke

Rajabhau More: नाट्य रसिकांच्या काळजात चर्रर करणारी एक बातमी अमरावतीमधून समोर आली आहे. रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अमरावती शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (वय ७८ वर्ष )यांचा काल रात्री ८ वा. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे. आयुष्यभर ज्या रंगभुमीची सेवा केली, त्याच रंगभुमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. नाटक पाहत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले.

अमरावती येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील 'थँक यु मिस्टर ग्लाड' हे नाटक सुरू होते. यावेळी राजाभाऊ मोरे प्रेक्षकगृहात बसून नाटक पाहत होते आणि त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात येत होते, मात्र त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. एका ज्येष्ठ रंगकर्मीने नाट्यगृहातच अखेरचा श्वास घेतल्याने संपूर्ण अमरावतीकर हळहळले आहेत.

अतिशय प्रतिष्ठित असा नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'जीवनगौरव पुरस्कार २०२२' हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. रंगभूमीला समर्पित केलेल्या जीवनाचा सन्मान म्हणून राजाभाऊ यांना पुरस्कार देण्यात आला आहे. ३३ वर्षांपूर्वी नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती नाट्य परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेत जवळपास ५०० सदस्य आहेत.

राजाभाऊ यांनी अमरावती शहरातच नाही तर ग्रामीण भागातही नाट्य चळवळ खोलवर रुजवली. त्यांनी आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत ४० वर्ष वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटक सादर केले. याशिवाय त्यांनी १०० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन ही केले होते. त्यांना आजवर विविध पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. नेपथ्य कलेतही ते अग्रेसर होते, शिवाय त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासात विविध नाट्यसंस्थांनाही मदत केली होती. राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागातही सुद्धा सतत कार्यरत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

SCROLL FOR NEXT