Alok Nath Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alok Nath Birthday : ६० रुपयांत करिअरची सुरूवात, आज आहेत कोट्यवधीचे मालक; अलोकनाथ यांना 'बाबूजी' का म्हटलं जातं?

Alok Nath Birthday : बॉलिवूडचे संस्कारी बाबुजी म्हणून प्रसिद्ध असलेले आलोक नाथ आज आपला ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. कुटुंबात कोणाचाच कधी अभिनयाशी संबंध नसतानाही त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, स्वत:चं स्थान प्रस्थापित केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचे संस्कारी बाबुजी म्हणून प्रसिद्ध असलेले आलोक नाथ आज आपला ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिहारच्या खरडिया गावात त्यांचा १० जुलै १९५६ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते, तर आई शिक्षिका. कुटुंबात कोणाचाच कधी अभिनयाशी संबंध नसतानाही त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, स्वत:चं स्थान प्रस्थापित केलं आहे.

त्यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक सीरियल्स आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८० मध्ये फिल्मी दुनियेत पाऊल टाकले. आपल्या सिनेकरियरमध्ये, त्यांनी बाबुजीचे पात्र साकारले आणि त्याच पात्राने त्यांना सर्वाधिक मोठी प्रसिद्धी मिळाली. थिएटर करत असताना, अलोक नाथ यांना ६० रुपये मानधन मिळायचे, असं त्यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

'हम आपके है कौन' मधील त्यांच्या भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता दिली. कमी वयापासून त्यांच्यावर बाबुजींचा पडलेला शिक्का आजही कायम राहिला आहे. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातला मोठं वळण ठरलं आहे. त्यानंतर बुनियादमधून बाबुजी बनून त्यांनी घराघरात प्रसिद्धी मिळवली. सूत्रांच्या माहितीनुसार, आलोक नाथ ७५ कोटी रुपयांचे मालक आहेत. ते एका चित्रपटासाठी ४० ते ५० लाख रुपये मानधन घेतात. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार्स कलेक्शनही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT