pushapa 2 upcoming movie saam tv
मनोरंजन बातम्या

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चे बजेट 500 कोटी, निर्मात्यांनी सांगितली रिलीजची तारीख

अभिनेता विजय सेतुपती 'पुष्पा 2' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - 'पुष्पा द राइज' पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनचा स्वॅग देशभरात चर्चेत आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील या धमाकेदार चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. पण 'पुष्पा'चे टशन हिंदी प्रेक्षकांच्या मनात एवढ्या दमदारपणे चालेल, अशी अपेक्षाही त्यांनी कधीच केली नव्हती. आता लाकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचे बोलले जात आहे.

'पुष्पा द राइज' पेक्षा 'पुष्पा 2' आणखी दमदार करण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. अभिनेता विजय सेतुपती 'पुष्पा 2' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तसेच अल्लू अर्जुनसोबत फहद फाजील आणि रश्मिका मंदान्ना देखील या चित्रपटात दिसणार आहे.

'पुष्पा पार्ट 2'साठी असे अॅक्शन सीक्वेन्स आणि स्टंट्स आखले जात आहेत. चित्रपट खास बनवण्यासाठी बजेटचा मोठा खर्च होणार आहे. त्यासाठी आता निर्मात्यांनी 'पुष्पा २'च्या बजेटबाबत असे अपडेट शेअर केले आहे. अल्लू अर्जुनच्या या दमदार सीक्वलचे बजेट 350 कोटी रुपये असणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. पण आता या चित्रपटाचे एक निर्माते वाय. रविशंकर यांनी 'पुष्पा 2'चे बजेट यापेक्षाही अधिक असणार आहे अशी माहिती दिली आहे.

हे देखील पाहा -

अलीकडेच, शंकर यांनी बिझनेस टुडेसोबत संवाद साधला. उत्तर भारतात चित्रपटाचे प्रमोशन करू शकलो नसल्याबद्दल मला अजूनही खंत आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे शंकर म्हणाले, "दक्षिण भारताबाहेर चित्रपटाला मिळालेल्या यशाने आम्ही नक्कीच आश्चर्यचकित झालो होतो. आम्हाला माहित नव्हते की हा चित्रपट इतका हिट होणार कारण आम्ही प्रमोशनला जास्त वेळ दिला नाही. तसेच 'पुष्पा 2' साठी 500 कोटी रुपये लागतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

10 भाषांमध्ये रिलीज करण्याची योजना

शंकर यांनी सांगितले की चित्रपटाचे यश आणि लोकप्रियता लक्षात घेऊन निर्माते आता हा चित्रपट 10 भाषांमध्ये आणि अनेक शेजारील देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.

रिलीजच्या तारखेचीही कल्पना दिली

निर्मात्यांनी असेही संकेत दिले आहेत ‘पुष्पा 2’ च्या प्रमोशनचे बजेट 5 पटीने वाढू शकते आणि 50 कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. यावेळी त्यांना देशाच्या प्रत्येक भागात जवळपास दोन महिने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करायचे आहे. शंकर पुढे बोलताना म्हणाले की, ऑगस्ट 2023 पर्यंत चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. आधीच्या वृत्तानुसार, हा चित्रपट डिसेंबर 2022 पर्यंत प्रदर्शित होणार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandhan Valley : सप्टेंबरमध्ये घ्या अविस्मरणीय अनुभव; मुंबई-नाशिकहून सांधण व्हॅलीला पोहोचण्याची संपूर्ण माहिती

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT