Pushpa 2 Team Accident Saam T
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Team Accident: 'पुष्पा 2' टीमच्या गाडीचा भीषण अपघात, चित्रपटातील कलाकार जखमी

Pushpa 2: 'पुष्पा 2' टीमच्या गाडीचा भीषण अपघात, चित्रपटातील कलाकार जखमी

Satish Kengar

Pushpa 2 Team Accident: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा - द रुल' चित्रपटाच्या क्रू मेंबर्सचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी चित्रपटाचे क्रू मेंबर्स शूटिंग पूर्ण करून त्यांच्या बसमधून परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला.

तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात त्यांच्या बसला अपघात झाला. या अपघातात काही क्रू मेंबर्स गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अल्लू अर्जुन बसमध्ये होता का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन हा अपघाताच्या वेळी बसमध्ये नव्हता. तो त्याच्या कारमधून प्रवास करत होता. यामुळेच तो या अपघातापासून बचावला आहे. (Latest Marathi News)

अलीकडेपर्यंत चित्रपटाचे संपूर्ण क्रू मेंबर्स मरेदुमिलीत होते. येथे संपूर्ण चित्रपटाची टीम अल्लू अर्जुनसोबत महत्त्वाच्या सीनची शूटिंग करत होते. पण शेड्युल संपल्याने हे सर्वजण आज बसने हैदराबादला परतत होते आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला.

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना 'पुष्पा-द रुल'साठी अजून थोडी वाट पहावी लागेल. 2024 पूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार नसल्याचे बोलले जात आहे. चित्रपटातील अनेक सीनचे चित्रीकरण झाले असले तरी काही सीन शूट शूट कार्याचे अजूनही बाकी आहेत.

अलीकडेच या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला अप्रोच करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT