Allu arjun and allu arvind Google
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 : संध्या थिएटर चेंगराचेंगरीतील जखमी मुलगा व्हेंटिलेटरवर ; अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी घेतली भेट

Pushpa 2 Sandhya Theater Incident: पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी संध्या थिएटर बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pushpa 2 : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल करत आहे. 'पुष्पा 2' ने दोन आठवड्यांत सुमारे १००० कोटी रुपये आणि जगभरात सुमारे १५०० कोटी रुपये जमा केले आहेत. दरम्यान, दुर्दैवाने संध्या थिएटरमध्ये घडलेला अपघातही या चित्रपटाशी जोडला गेला होता. यावेळी एक मुलगा जखमी झाला तर त्याच्या आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरुद्ध खटला सुरू आहे. ११ वर्षीय बालक श्रतेजची प्रकृती गंभीर असून त्याची विचारपूस करण्यासाठी अल्लू अर्जुनचे वडील निर्माते अल्लू अरविंद रुग्णालयात पोहोचले.

अल्लू अरविंद यांनी मुलाच्या प्रकृतीचा घेतला आढावा

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्रीतेजच्या तब्येतीची मला काळजी आहे, मात्र त्याचे नावही या प्रकरणाशी जोडले गेले असल्याने त्याला रुग्णालयात जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनीही श्रतेजच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची आणि परिवाराची भेट घेतली.

काय म्हणाले अल्लू अरविंद?

यावेळी अल्लू अरविंद यांनी मुलाच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आणि मुलाच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली. श्रीतेजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमशीही त्यांनी चर्चा केली. संध्या थिएटरबाहेर घडलेली ही घटना दुर्दैवी असून ती घडायला नको होती, असे ते म्हणाले. तेलंगणा सरकारने आम्हाला पूर्ण सहकार्य केले आहे. अल्लू अर्जुनच्या वतीने मी रुग्णालयात आलो आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने तो सध्या रुग्णालयात येऊ शकत नाही.

मला लोक, नातेवाईक आणि चाहते विचारत आहेत की अल्लू अर्जुन हॉस्पिटलला का येत नाही. याचं कारण म्हणजे अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयात येणार होता, पण रुग्णालय व्यवस्थापनाने प्रीमियरला जे झालं तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून त्याला न येण्याचा सल्ला दिला,” असं अल्लू अरविंद म्हणाले. तसेच मी देखील राज्य सरकारची परवानगी घेतल्यानंतरच मुलाच्या भेटीसाठी रुग्णालयात आल्याचे अल्लू अरविंद यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT