Pushpa 2 First Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun's Pushpa 2 Poster: आदिपुरुषनंतर आता 'पुष्पा 2'च्या पोस्टरवरून वाद; 'हा देवांचा अपमान आहे' म्हणत केली टीका

Allu Arjun's Pushpa 2 Look: 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनने धारण केला कालीमातेचा अवतार.

Pooja Dange

Controversy on Allu Arjun's Pushpa 2 Poster: अल्लू अर्जुनाचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक उत्सुक आहेत. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 'पुष्पा द रुल'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2'मधील त्याचा पहिला लूकही चाहत्यांना दाखविण्यात आला. अल्लू अर्जुनचा नवा लूक पाहून प्रेक्षक भारावून गेले.

'पुष्पा 2' मधील फर्स्ट लूकमध्ये अल्लू अर्जुनचे संपूर्ण अंग निळ्या दिसत आहे, तर त्याने लिंबाचा हार, फुलांचा हार, नाकात नथ, कानात मोठे झुमके, ब्लाउज आणि जरीची साडी नेसलेला आहे. त्याचे हे रूप आई कालीमातासारखे भासत आहे.

अल्लू अर्जुनचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तर दुसरीकडे माँ कालीचा वेश हा हिंदू देवीचा अपमान असल्याचे सांगत काहींनी या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे.

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा 2 चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 3.14 मिनिटांच्या टीझरमध्ये पुष्पाला शोधण्याची लोकांची लगबग पाहायला मिळत आहे. या टीझरची सुरुवात होते, 'पुष्पा'च्या शोधात पोलीस कुत्र्यांसह फिरत असतात. मात्र, त्यांना पुष्पाचा रक्ताने माखलेला शर्ट सापडते, ज्यावर अनेक गोळ्या झाडलेल्या असतात.

शर्टवरील गोळ्यांचे निशाण पाहून पुष्पा या जगात राहिला नाही असा अंदाज पोलीस लावतात. यानंतर शहरांमध्ये दंगली सुरू होतात. यासाठी लोक पोलिसांना दोष देतात. टीझरच्या शेवटी एक व्यक्ती वाघाभोवती घिरट्या घालताना दिसत आहे. वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुष्पा वाघासोबत दिसतो. यानंतर लोकांमध्ये खळबळ उडते.

अल्लू अर्जुनने त्याच्या अकाऊंटवर माँ कालीच्या वेषातील एक पोस्टर शेअर केले होते. हे पोस्टर पाहून चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. एका यूजरने लिहिले, मैं झुकेगा नहीं. तसेच हे पोस्टर पाहून अनेक यूजर्सनी त्याला ट्रोल देखील केले आहे. एका यूजरने लिहिले की, अल्लू अर्जुन भूल भुलैयाच्या मंजुलिकासारखा दिसत आहे. दुसर्‍याने लिहिले की, मला वाटले की मी पुष्पाऐवजी कांचनाचे पोस्टर पाहिले.

काही सोशल मीडिया यूजर्सनी 'पुष्पा 2'च्या पोस्टरवर नाराजीही व्यक्त केली आहे. एका नेटिझनने लिहिले की, त्याने देवीचा अवतार धारण केला आहे आणि तिच्या हातात पिस्तूल आहे. तो एका चित्रपटात गुंडाची भूमिका करत आहे, आमच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्याचबरोबर इतर अनेक यूजर्सनीही यावर आक्षेप घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT