Allu Arjun Grandmother Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Grandmother Death: अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Allu Arjun Grandmother Passes Away : तेलुगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अल्लू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'पुष्पा' फेम स्टार अल्लू अर्जुनच्या आजीच्या निधनाने तेलुगू इंडस्ट्री शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Allu Arjun Grandmother Passes Away : तेलुगू इंडस्ट्रीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. पॅन इंडिया स्टार अल्लू अर्जुनची आजी आणि तेलुगू ज्येष्ठ अभिनेते अल्लू रामलिंगैया यांच्या पत्नी अल्लू कनकरत्नम गरू यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.

काही काळापासून आजारी होत्या

माहितीनुसार, अल्लू कनकरत्नम गरू गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांना वृद्धपकाळामुळे अनेक आजार होते आरोग्य समस्यांमुळे त्रस्त होत्या. ही दुःखद बातमी समोर येताच अल्लू कुटुंबात शोककळा पसरली. अल्लू अर्जुनचे चाहते आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोक अल्लू कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कोकापेटमध्ये त्यांचे अंतिम संस्कार केले जातील.

राम चरणने शूटिंग रद्द केले

ही दुःखद बातमी समोर येताच, त्यांचा नातू आणि सुपरस्टार राम चरण यांनी म्हैसूरमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाचे शूटिंग तात्काळ रद्द केले आहे. राम चरण लवकरच हैदराबादला पोहोचतील. त्याच वेळी, सध्या मुंबईत अ‍ॅटलीच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार करत असलेलला अल्लू अर्जुन देखील लवकरच हैदराबादला पोहोचला आहे. दरम्यान, मेगास्टार चिरंजीवी अल्लू अरविंद यांची अनेक कलाकार येऊन भेट घेत आहेत.

अल्लू अर्जुनच्या आजीवर अंत्यसंस्कार कधी होणार?

अभिनेता अल्लू अर्जुनची आजी अल्लू कनकरत्नम यांच्यावर अंत्यसंस्कार आज दुपारी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी कोकापेट येथे होणार आहे. अल्लू-कोनिडेला कुटुंबातील सर्व सदस्य अल्लू अरविंद यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत. ही माहिती मिळताच अभिनेत्याचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या आजीला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड येथे डिझेलच्या टँकरचा अपघात झाल्याने धुळे सोलापूर महामार्गावरील बसाना पाली जवळ मोठी गर्दी

पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Tourism: बोरीवलीपासून अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन; या विकेंडला स्वस्तात मस्त प्लॅन करा

SCROLL FOR NEXT