Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : पुष्पाला जेवू दिलं नाही, थेट बेडरूममध्ये घुसले पोलीस? पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

Allu Arjun Gets Bail : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर झाला आहे. त्याला पोलीसांनी नेमकी कशी वागणूक दिली जाणून घ्या.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीज दरम्यान घडलेल्या घटनेमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याला काल(13 डिसेंबर) पोलीसांनी अटक केली होती. मात्र आता अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर झाला आहे.

अल्लू अर्जुनला कनिष्ठ न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र रात्री त्याला जामीन मंजूर करण्यात आला. हायकोर्टाकडून हा जामीन मंजूर झाला आहे. अल्लू अर्जुनला ताब्यात घेतल्यामुळे तेलंगणा पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गे. अभिनेत्याला नाश्ता आणि कपडे बदलू दिले नसल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. तसेच पोलिस त्याच्या बेडरूममध्ये घुसले होते, असेही बोले गेले.

पोलीसांची प्रतिक्रिया

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun ) या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप फेटाळून लावला. हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, "जेव्हा पोलिस त्याच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्याने कपडे बदलण्यासाठी थोडा वेळ मागितला. तो त्याच्या बेडरूममध्ये गेला, पोलिस बाहेर थांबले आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्यांनी त्याला ताब्यात घेतले."

पुढे पोलीस म्हणाले की, "अल्लू अर्जुनसाठी कोणत्याही पोलिसांनी बळाचा वापर केला नाही किंवा त्याच्याशी गैरवर्तन केले नाही. तसेच त्याला कुटुंबाशी आणि पत्नीशी बोलण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात आला. तेलंगणा उच्च न्यायालयाने अभिनेत्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला असून त्याला चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे."

नेमकं प्रकरण काय?

4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चित्रपट दाखवण्यात आला. तेथे साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT